शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

व्हॅलेनटाईन डे ला पार्टनरला बाहेर घेऊन जायचंय? वन डे रिटर्न ट्रिपसाठी 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:10 IST

व्हॅलेंटाईन वीक सरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत.

व्हॅलेंटाईन वीक सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्हाला आपल्या पार्टनरसोबत व्हॅलेनटाईन डे एन्जॉय करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.  ज्या ठिकाणी तुम्ही एका दिवसात सुद्धा जाऊन येऊ शकता. कारण व्हॅलेनटाईन डे साठी आपल्याला कधीच सुट्टी वैगेरे मिळत नसते. तरी सुद्धा तो दिवस आपण पार्टनरसोबत घालवावा असं आपल्याला वाटत असतं. काही ठिकाणं अशी आहेत जी मुंबईपासून काही अंतरावर  आहेत. या ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत व्हॅलेनटाईन डे साजरा करून आपल्या घरी सुद्धा लवकर पोहोचू शकता. चला तर मग जाणून घ्या कोणती आहेत ती ठिकाणं.

लोणावळा

(image credit- trip advisor)

भारतीयांबरोबरच परदेशी नागरिकांना भुरळ लोणावळ्याने घातली आहे. मुंबईपासून ४ तासांच्या अंतरावर  हे पर्यटनस्थळ आहे. येथील धबधबे, धरणं, किल्ले नेहमीच पर्यटकांना आकर्षिक करत असतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत या ठिकाणी गेलात तर लॉन्ग ड्राईव्ह किंवा बाईक राईडचा आनंद तुम्हाला घेता येईल.

माथेरान

निसर्ग सौंदर्याने नटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे- मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’. हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे.पॅनोरमा, गार्बेट, अलेक्सझांडर, हार्ट, लिटल चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पाक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, आदी पॉईंटस् पाहण्यासारखे आहेत.इथल्या निसर्गसौंदर्याला अजूनतरी प्रदुषणाचे गालबोट लागलेले नाही. 

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही आधी ट्रेनने नेरळला जा. त्यानंतर तुम्हाला खासगी वाहनं अमनलॉज स्टेशनपर्यंत  सोडतील. त्यानंतर घोडे किंवा पायी चालत तुम्ही माथेरानचे सौंदर्य पाहू शकता. जर तुम्हाला घरी लवकर जायचं असेल तर संपूर्ण दिवस तुम्ही भटकंती करून आपल्या घरी परतू शकता. ( हे पण वाचा-एन्जॉय करण्यासाठी कोकणातली 'ही' पर्यटन स्थळं आहेत बेस्ट, कमी खर्चात जास्त मजा)

अलिबाग

मुंबईच्या जवळील एक सुंदर पर्यटनस्थळ अशी अलिबागची ओळख आहे. पण, अलिबाग हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाणही आहे. तुम्ही बोट किंवा बाईक, कारने या ठिकाणी जाऊ शकता. पार्टनरला सरप्राईज देऊ शकता. अलिबागला मुंबईवरून जाण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. शिवाय बोटीने जर तुम्ही  जात असाल तर गेट वे ऑफ इंडियाला जावं लागेल. त्यानंतर तुम्ही बोटीने हा प्रवास कमीत कमी खर्चात करू शकता. जर तुम्हाला बाईक किंवा बसने या ठिकाणी जायचं असेल तर पनवेल मार्गे जाऊ शकता. ( हे पण वाचा- भारतातील 'या' ठिकाणांवर जायला भारतीयांनाच नो एन्ट्री....)

माळशेज घाट 

(image credit- holidity)

माळशेज घाट हा पश्चिम घाटांमधील एक डोंगरी खिंड आहे. माळशेज घाटामध्ये अनेक धबधबे आहेत आणि विशेषतः पावसाळ्यात इथली हिरवाई अप्रतिम दिसते. मुंबईपासून १५४ किमी आणि पुण्यापासून १३० किमीवर हे ठिकाण आहे. माळशेज घाट हे हायकर्स, ट्रेकर्ससाठी हे उत्तम ठिकाणं आहे.  गर्दीच्या ठिकाणापासून दूर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स