Travel Tips: नवीन वर्षात क्रूझ टूर प्लॅन करताय? IRCTC वेबसाईटवरून बुकिंग आता सहज शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:45 IST2024-12-16T13:44:22+5:302024-12-16T13:45:49+5:30

New Year 2025 Travel Tips: विमान प्रवासाइतकाच क्रूझ प्रवासही रोमांचित करणारा असतो, येत्या वर्षात हा थ्रिल अनुभवायचा असेल तर जाणून घ्या माहिती. 

Travel Tips: Planning a cruise tour in the New Year? Booking is now easy from the IRCTC website! | Travel Tips: नवीन वर्षात क्रूझ टूर प्लॅन करताय? IRCTC वेबसाईटवरून बुकिंग आता सहज शक्य!

Travel Tips: नवीन वर्षात क्रूझ टूर प्लॅन करताय? IRCTC वेबसाईटवरून बुकिंग आता सहज शक्य!

२०२४ चे वर्ष सरत आले आणि आता प्रत्येकाला वेध लागले नवीन वर्षाच्या अर्थात २०२५ च्या आगमनाचे (New Year 2024 travel tips)! येत्या वर्षात काही वेगळे अनुभवायचे असेल तर क्रूझ ट्रिपचा प्लॅन नक्कीच करू शकता. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर, तुम्हाला टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा आणि बजेटबद्दल तपशीलवार माहिती वाचायला मिळेल. मात्र, तिकीट बुक करण्यापूर्वी सगळी माहिती काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या टूरची थोडक्यात माहिती जाणून घ्या. 

टायटॅनिक चित्रपट पाहिलेली प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी जहाजातून प्रवास करायचा हे स्वप्न पाहते. आताच्या काळात ही स्वप्नपूर्ती सहज साध्य आणि खिशाला परवडेल अशी आहे. फक्त अज्ञानाअभावी आपण तशी ट्रिप प्लॅन करत नाही. मात्र येत्या वर्षात तुम्हाला हा रोमांचित करणारा प्रवास अनुभवायचा असेल तर क्रूझ टूर बद्दल जाणून घ्या आणि आगाऊ नोंदणी करा. ती कशी करायची ते जाणून घ्या. 

कधीकधी टूर पॅकेजसह प्रवास करणे खिशाला परवडते. कारण, ते ग्रुप प्रीबुकिंगवर कमी किंमतीत अधिक सुविधा देतात. ही सुविधा भारतातही मिळू लागली आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना खासगी कंपन्यांकडून पॅकेज पुरवत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या सामान्य पॅकेजबद्दलच अनेकांना माहिती असते, मात्र क्रूझ ट्रिप बद्दल कोणी फारशी चौकशी करत नाही. आज आपण त्याबद्दल अधिक माहिती घेऊया. 

भारतीय रेल्वे आपल्या क्रूझ टूर पॅकेजमध्ये परवडणाऱ्या दरात लक्झरी सुविधा देते. प्रवास, निवास, जेवण आणि मनोरंजन इत्यादी गोष्टी त्या पॅकेजमध्ये समाविष्ट असतात. तुम्हाला कुठे जायचे आहे ते ठरवा किंवा तुमच्या खिशाला कोणते टूर पॅकेज परवडणार आहे ते बघा आणि ठिकाण ठरल्यावर पुढे दिल्याप्रमाणे बुकिंग करा. 

क्रूझ टूर पॅकेज कसे बुक करावे?

>> यासाठी सर्वप्रथम भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट, irctctourism.com Google सर्च करा. 
>> भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर, सर्वप्रथम तुम्हाला स्थानानुसार वेगवेगळ्या पॅकेजची नावे दिसतील.
>> तिथे तुम्हाला हॉटेल, फ्लाइट, पॅकेज आणि क्रूझ सारख्या तिकीट बुकिंगचे आयकॉन देखील दिसतील.
>> तुम्हाला क्रूझ टूर पॅकेज बुक करायचे आहे, त्यामुळे क्रूझ पर्यायावर क्लिक करा.
>> यानंतर, तुमच्यासमोर दोन प्रकारचे पॅकेज पर्याय उघडतील, ज्यामध्ये तुम्हाला भारतात आणि भारताबाहेरील टूर पॅकेजचा पर्याय दिसेल. 
>> IRCTC टूर पॅकेजमध्ये दिलेली माहिती वाचून तिकीट बुक करा.
>> भारतात आणि परदेशात क्रूझ टूर निवडण्यासाठी अनेक ठिकाणांची माहिती दिली असेल. 
>> लक्षात ठेवा की टूर पॅकेज बुक करण्यापूर्वी, तुम्हाला चौकशी फॉर्म भरावा लागेल.
>> चौकशी फॉर्म भरण्यापूर्वी, तपशील पहा पर्यायावर जा आणि पॅकेजमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये वाचा.
>> यामध्ये तुम्हाला ईमेल आयडी, तुमचे नाव, नंबर, किती लोक प्रवास करणार आहेत आणि मुलेही तुमच्यासोबत जाणार आहेत की नाही अशी माहिती द्यावी लागेल. सर्व तपशील दिल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून एक मेल येईल. या मेलमध्ये तुम्हाला संदर्भ क्र. मिळेल. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेकडून कन्फर्मेशनचा कॉल येईल. 
>> त्यानंतर तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून टूर पॅकेज बुक करू शकता.

नवीन वर्षात नवीन काही अनुभवुया, प्रवास करूया, जग बघूया, सतर्क राहूया आणि चौकटीबाहेरचे जग पाहूया. 

Web Title: Travel Tips: Planning a cruise tour in the New Year? Booking is now easy from the IRCTC website!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.