जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्याबाबत जाणून घेतल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे उदाहरण हेच घ्या ना की, नेदरलॅंडमधील गीएथूर्न गावात ना रस्ते आहेत ना कार्स. कारण इथे लोक प्रवास करण्यासाठी बोटींचा वापर करतात. अशाच आणखी काही खास आणि विचित्र गावांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इथे तुम्ही भेट देऊ शकता.
या गावाकडे आहे स्वत:चा 'सूर्य'
इटलीमध्ये स्थित हे Viganella गाव इतकं खोल दरीत दडलेलं आहे की, इथे सूर्याचा प्रकाशही पोहोचत नाही. त्यानंतर दोन इंजिनिअर्सनी मिळून एक मिरर लावला. ज्यावर सूर्याचा प्रकाश रिफ्लेक्ट होऊन गाव प्रकाशमय होतं. त्यामुळे या गावाला स्वत:चा 'सूर्य' असलेलं गाव म्हणून ओळखलं जातं.
किडनी व्हॅली
हे नावच इतकं विचित्र वाटतं, पण हे असंच नाव आहे. नेपाळमध्ये एक असं गाव आहे, ज्याला किडनी व्हॅली नावाने ओळखलं जातं. यामागचं कारण म्हणजे या गावातील लोकांची वाईट आर्थिक परिस्थिती. असे सांगितले जाते की, नेपाळमधील Hokse गाव इतकं गबीर आहे की, येथील लोकांना पोट भरण्यासाठी त्यांची किडनी विकावी लागते. इथे राहणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे आता एकच किडनी शिल्लक आहे. त्यामुळे या गावाला एक किडनीवालं गाव म्हणूनही ओळखलं जातं.
'कुंग फू'चं गाव
चीनमध्ये Tianzhu नावाचं एक असं गाव आहे जिथे सर्वांना कुं फू मार्शल आर्ट्स येतं. आणि सर्वांकडेच एक सीक्रेट हत्यार आहे. इथे लोक कुंग फू चे वेगवेगळे स्टाइल शिकण्यासाठी येतात. या गावाची हीच खासियत पर्यटकांना या गावाकडे आकर्षित करते.
दरवाजे नसलेलं गाव
कदाचित जगातलं हे असं एकच गाव असावं जिथे ना घरांना दरवाजे आहेत ना दुकानांना. हे गाव आहे शनी शिंगणापूर. या गावातील लोक असं मानतात की, या गावावर भगवान शनीची कृपा आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या घरांना कुलूप किंवा दरवाजे लावण्याची गरज पडत नाही.