पर्यटकांना भूरळ घालतात जगभरातील 'ही' यूनिक डेस्टिनेशन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:35 IST2019-01-03T15:34:21+5:302019-01-03T15:35:07+5:30

संपूर्ण जगभरात मागील दशकात पर्यटन उद्योगात फार बदल झाले असून अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी उत्सुक असतात. मॉरिशस, मालदीव, बँकॉक, सिंगापूर, बाली, सेशेल्स यांसारखी अनेक खास ठिकाणं पर्यटकांच्या टॉप डेस्टिनेशन्सच्या यादीमध्ये आहेत.

These unique destinations of the world calling travelers | पर्यटकांना भूरळ घालतात जगभरातील 'ही' यूनिक डेस्टिनेशन्स!

पर्यटकांना भूरळ घालतात जगभरातील 'ही' यूनिक डेस्टिनेशन्स!

संपूर्ण जगभरात मागील दशकात पर्यटन उद्योगात फार बदल झाले असून अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी उत्सुक असतात. मॉरिशस, मालदीव, बँकॉक, सिंगापूर, बाली, सेशेल्स यांसारखी अनेक खास ठिकाणं पर्यटकांच्या टॉप डेस्टिनेशन्सच्या यादीमध्ये आहेत. तसेच यांपेक्षा थोडी वेगळी आणि हटके अशी काही ठिकाणंही आहेत, जी आपल्या निसर्गसौंदर्याने नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात. काही दिवसांपूर्वीच एका ट्रॅव्हल वेबसाइटने एक यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये जगातील यूनिक शहरांमध्ये जॉर्डनमधील वाडी रमला प्रमुख मान्यता देण्यात आली आहे. तर उज्बेकिस्तान, कोलंबिया, मोरक्को आणि मेक्सिकोमधील काही शहरांनी देखील टॉप 10च्या यादीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. जाणून घेऊया या शहरांबाबत...

मोरक्कोमधील आरजजाटे

खरं तर सर्व तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या 'गेम ऑफ थ्रोंस' या वेबसीरिजमुळे या शहराला लोकप्रियता मिळाली. अनेक पर्यटक येथे सुर्योदय आणि सुर्यास्त पाहण्यासाठी येतात. येथे पोहोचणंही फार सोपं आहे. हे शहर तुम्ही पायी चालत देखील एक्सप्लोर करू शकता किंवा एखादी टॅक्सी हायर करू शकता. ज्या व्यक्तींना फोटोग्राफीची आवड आहे, त्या व्यक्ती येथे एखादं फोटोग्राफी वर्कशॉपही करू शकतात. जून ते सप्टेंबरपर्यंत येथील सर्वाधिक तापमान 32 डिग्री असतं. त्यानंतर येथील वातावरणामध्ये गोरवा असतो. त्यामुळे येथे फिरण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असतं. 

पालमोनियामधील कॅरेबियन तट

पालमोनिया, कोलंबियाच्या उत्तरेच्या तटावर स्थित असलेल्या समुद्र किनाऱ्यावर वसलेलं एक शहर. या शहरात पर्यटकांना निसर्गसौंदर्यासोबतच वन्यजीव पाहण्यासाठीही येत असतात. ज्या लोकांना अॅडव्हेंचर अॅक्टिविटी आवडते ते पालोमिनो नदीवर ट्यूनिंग करू शकतात. 

किगाली, रवांडा 

'हजार डोंगरांची भूमी' म्हणून ओळखलं जाणारं किगाली शहर रवांडाची राजधानी आहे. ज्वालामुखी नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या माउंटन गोरिलाला पाहण्यासाठी पर्यटक या शहराला भेट देतात. 

बकलार, मेक्सिको

अनेक पर्यटकांमध्ये या शहराची ओळख मस्ट विजिट ट्रेवल डेस्टिनेशन अशी आहे. या शहराची आणखी एक ओळख म्हणजे, येथील निसर्गसौंदर्यामध्ये असलेले तलाव. येथे फिरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. त्यामुळे येथे फिरण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

व्हॅली ऑफ द मून, जॉर्डन

जर कोणत्याही शहरातील लोकल कल्चर जवळून अनुभवायचे असले तर,  तुम्ही एकदा तरी जॉर्डनमधील वाडी रमला भेट द्यावी. यूनीक डेस्टिनेशनच्या यादीमध्ये याला पहिलं स्थान देण्यात आलं आहे. वाळूचे उंचउंच डोंगर आणि वाळवंट पर्यटकांना आकर्षित करते. वाडी रमला 'व्हॅली ऑफ द मून' या नावाने ओळखलं जातं. ही जॉर्डनची सर्वात मोठी दरी आहे. 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' चित्रपटाचे चित्रिकरण वाडी रममध्ये करण्यात आले होते. त्यानंतर 1962मध्ये येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. इको-अॅडवेंचर टूरिज्म येथील लोकांच्या उत्पन्नाचं एक मोठं साधन आहे. उंट आणि घोड्यांची सवारी येथे येणाऱ्या पर्यटकांना भूरळ घालत असते. 

समरकंद, उज्बेकिस्तान

ज्यांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेट द्यायला आवडतं. त्यांनी उज्बेकिस्तान येथील समरकंदला अवश्य भेट द्यावी. सिल्क रोड वर स्थित असलेलं समरकंद मध्य एशियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. हे ऐतिहासिक शहर मध्ययुगीन वास्तुकला आणि स्मारकांसाठी उत्तम पर्याय आहे. येथील आर्किटेक्चर तुम्हाला हजारो वर्षांपूर्वीच्या कला अनुभवण्याची संधी देईल. 

Web Title: These unique destinations of the world calling travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.