हे आहेत ‘बाहुबली’ चित्रपटाचे आकर्षक शुटिंग लोकेशन्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 13:00 IST2017-05-17T07:28:11+5:302017-05-17T13:00:42+5:30
हा चित्रपट जेवढा दमदार तेवढे त्याचे शुटिंग लोकेशन्सदेखील दमदार होते. चला पाहूया बाहुबलीचे आकर्षक आणि सुंदर शुटिंग लोकेशन्स.

हे आहेत ‘बाहुबली’ चित्रपटाचे आकर्षक शुटिंग लोकेशन्स !
एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’चा पहिला भाग १० जुलै २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचा बजेट सुमारे २५० ते २६० करोड रुपयांपर्यंत होता. शिवाय नुकताच बाहुबलीचा दुसरा भागही रिलीज झाला ज्याने सुमारे १००० करोड पर्यंत बिजनेस करुन एक इतिहास रचला.
हा चित्रपट जेवढा दमदार तेवढे त्याचे शुटिंग लोकेशन्सदेखील दमदार होते. चला पाहूया बाहुबलीचे आकर्षक आणि सुंदर शुटिंग लोकेशन्स.

* ओर्व्हाकल रॉक गार्डन्स, कुर्नुल, आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेशातील कुर्नुल येथील ओर्व्हाकल रॉक गार्डन हे भारतातील प्रसिद्ध असे रॉक गार्डन आहे. विशेष म्हणजे ‘बाहुबली’ द बिगिनिंग या चित्रपटाच्या शुटिंगची सुरुवात याच गार्डनमध्ये ६ जुलै २०१३ मध्ये झाली होती.

* नायगारा (अतिरापिळ्ळी) धबधबा, तृशुर, केरळ
केरळ मधील सर्वात मोठा धबधबा म्हणजे अतिरापिळ्ळी धबधबा. हाच धबधबा भारतात नायगारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. या धबधब्याजवळ बाहुबली चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होेते.

* सह्याद्रीच्या पर्वतरांगा, महाबळेश्वर, महाराष्ट्र
सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्येही बाहुबलीचे शुटिंग करणात आले होते. चित्रपटाच्या शुटिंगसाठी पोषक वातावरण जसे ढगाळ व थंड हवामान, पाऊस आदी नैसर्गिक सौंदर्याने भरभरून असलेल्या महाबळेश्वर या ठिकाणी बाहुबलीचे शुटिंग करण्यात आले.

* रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद, तेलंगाणा
हैदराबाद मधील रामोजी फिल्म सिटी एक पर्यटन स्थळ तसेच जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बाहुबली चित्रपटाती युद्धाचे क्षण चित्रीत करण्यात आले होते.