इंटरनॅशनल तिकीट खरेदी करा आणि थायलॅंडमध्ये फिरा अगदी मोफत! पाहा काय आहे स्कीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:22 IST2025-10-11T15:17:48+5:302025-10-11T15:22:42+5:30
Thailand Tourist Plan : “Buy International, Free Thailand Domestic Flights”, असं या स्कीमचं नाव असून ज्यामुळे इथे फिरणं अधिक सोपं आणि मजेदार होणार आहे.

इंटरनॅशनल तिकीट खरेदी करा आणि थायलॅंडमध्ये फिरा अगदी मोफत! पाहा काय आहे स्कीम
Thailand Tourist Plan : वेगवेगळ्या भन्नाट लोकेशनवर फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये कधीना कधी थायलॅंडला जाण्याची इच्छा नक्कीच असते. थायलॅंडला जाऊन तेथील निसर्गाचा त्यांना मनमुराद आनंद घ्यायचा असतो. पण काही लोकांचं जास्त बजेटमुळे ह स्वप्न अधुरंच राहतं. अशात जर आपल्याला समजलं की, थायलॅंड आपल्याला फ्री फ्लाइटने फिरवणार आहे, तर? होय, थायलॅंड सरकारने एक भन्नाट स्कीमचा विचार केला आहे. “Buy International, Free Thailand Domestic Flights”, असं या स्कीमचं नाव असून ज्यामुळे इथे फिरणं अधिक सोपं आणि मजेदार होणार आहे. पण या स्कीमवर अजून सरकारचं शिक्कामोर्तब व्हायचं आहे.
काय आहे ही स्कीम?
थायलॅंड सरकारच्या विचारात असलेल्या या योजनेअंतर्गत जर तुम्ही थायलॅंडचं इंटरनॅशनल फ्लाइट तिकीट खरेदी केलंत, तर तुम्हाला देशाच्या आतल्या डोमेस्टिक फ्लाइट्स मोफत मिळतील. त्यामुळे पर्यटक केवळ बँकॉक किंवा फुकेतपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर इतर सुंदर शहरं आणि इतर भागातही फिरू शकतील.
स्कीम कशी चालेल?
थायलॅंड सरकार डोमेस्टिक फ्लाइटच्या तिकिटांचा खर्च उचलेल. एका बाजूचं तिकीट 1,750 बाट (सुमारे ₹4,000) आणि राउंड ट्रिप 3,500 बाट (सुमारे ₹8,000) इतकी असेल. या फ्लाइट्स UNESCO वर्ल्ड हेरिटेज सिटीज, प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट्स आणि विविध राज्यांमध्ये चालतील. ही योजना सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान घेतल्या जाऊ शकतील. भारतासह इतर देशांतील पर्यटक ज्यांनी इंटरनॅशनल तिकीट घेतलं आहे, त्यांनाच हा लाभ मिळेल. प्रत्येक प्रवाशाला २ फ्री डोमेस्टिक फ्लाइट्स आणि २० किलो बॅगेज अलाउन्स मिळेल.
स्कीमचे फायदे
या प्रकल्पामुळे किमान २ लाख विदेशी पर्यटक थायलॅंडला येतील अशी अपेक्षा आहे. ही स्कीम Tourism Authority of Thailand (TAT) द्वारे चालवली जाईल. यात 6 एअरलाईन्स सहभागी आहेत त्यात Thai AirAsia, Bangkok Airways, Nok Air, Thai Airways, Thai Lion Air आणि Thai VietJet यांचा समावेश आहे. सरकारला या योजनेमुळे थेट 8.81 अब्ज बाट आणि एकूण 21.80 अब्ज बाट इतका आर्थिक फायदा होईल.
थायलंडच्या इतर टुरिझम स्कीम्स
थायलंड सरकारने “Half-Price Thailand Travel” स्कीमही सुरू केली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना कमी दरात प्रवास करता येतो. मोठ्या शहरांमध्ये या स्कीमचे स्लॉट पूर्ण बुक झाले आहेत, आणि लहान शहरांतील स्लॉट सप्टेंबरपर्यंत संपण्याची शक्यता आहे. यशस्वी झाल्यास या स्कीमचा दुसरा टप्पा सुरू केला जाईल.
कोणत्या ठिकाणी सध्या जाणं टाळावं
मॉनसूनच्या काळात थायलंडमध्ये मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे काही भागात प्रवास कठीण होतो.
सेंट्रल रिजन (बँकॉक आणि आसपासचे भाग)
फुकेत आणि क्राबी ही लोकप्रिय बीच ठिकाणं आहेत. पण पावसाळ्यात इथे धोका असतो.
गल्फ ऑफ थायलंड (कोह समुई, कोह फंगन, कोह ताओ) इथेही मुसळधार पाऊस पडतो.
सध्या कुठे फिरू शकता
खाओ सोक नॅशनल पार्क: डोंगर, तलाव आणि गुहांनी भरलेलं नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण.
चिआंग माय: हिरवागार निसर्ग, धबधबे आणि 100 हून अधिक बौद्ध मंदिरे इथे पाहायला मिळतात.
चिआंग राई: सांस्कृतिक वारसा, प्राचीन मंदिरे आणि प्रसिद्ध व्हाईट व ब्लू मंदिरांसाठी ओळखलं जातं.
ही नवीन स्कीम थायलॅंडमध्ये अजून सुरू व्हायची आहे. त्यामुळे जर तुम्ही परदेशात फिरायचं ठरवत असाल, तर थायलंडची ही “फ्री फ्लाइट” संधी नक्की गमावू नका!