ही ६ झाडं पहा, फुकट आणि यादगार उन्हाळी ट्रिप फुकटात करा!

By admin | Published: May 11, 2017 04:25 PM2017-05-11T16:25:40+5:302017-05-11T16:25:40+5:30

उन्हाळ्यात एक पै खर्च न करता, कमीत कमी वेळात रंगबिरंगी ट्रिप करायची आहे,सहलीला जायचंय, मग चालायला लागा..

See these 6 trees, freak and miss a memorable summer trip! | ही ६ झाडं पहा, फुकट आणि यादगार उन्हाळी ट्रिप फुकटात करा!

ही ६ झाडं पहा, फुकट आणि यादगार उन्हाळी ट्रिप फुकटात करा!

Next

- निशांत महाजन

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना घेवून ट्रीपला जायचंय? पण वेळ नाही म्हणता, लांब कशाला जायला हवं, तुमच्या शहरांत, तुमच्या गल्लीतही भल्या सकाळीच काय दुपारी, संध्याकाळी ऊन उतरतानाही एक चक्कर मारुन तुम्ही मुलांसह स्वत:लाही एक अद्भूत, रंगबिरंगी सफर फुकटात घडवू शकता. एक पैसा खर्च न करता निसर्गानं दिलेले उन्हाळ्याचे अत्यंत व्हायब्रण्ट कलर्स घरी घेवून येवू शकता. आणि नजरेचं पारणं फेडणारं सौंदर्य पाहताना जगाचं भानही काही काळ विसरु शकता!
खरं नाही ना वाटत? नाहीच वाटणार, कारण आपल्या नजरेसमोर भर उन्हात चालणारा हा निसर्गाचा रंगोत्सव आपण पाहतच नाही. आपल्या लाईफस्टाईलच्या तोऱ्यात निसर्गाच्या जादूई रंगाची एक सर सुद्धा आपल्या नजरेत उतरत नाही. आणि मग मुलांना मॉलमध्ये नेण्यापलिकडची दुसरी कुठलीच भारी जागा आपल्याला दिसत नाही. कारण आपल्यालाच त्या जागा माहिती नसतात. त्यामुळे जरा नजर ‘तयार’ करा, तुमच्या शहरातच, नेहमीच्या ये-जा करण्याच्या, आॅफिसच्या रस्त्यांवर दिसतील ही झाडं, ती पहा. त्यांच्या फुलांचा रंग-गंध जमल्यास श्वासात भरुन आणा. हा उन्हाळा मग आजवरच्या साऱ्या उन्हाळ्यापेक्षा वेगळा तर असेलच, पण आपण उन्हाळा जगलो असंही वाटेल..
त्यासाठी उन्हाळ्यात बहरलेली ही झाडं पहा. अनेक महानगरपालिकांच्या कृपेनं जुने वृक्ष कापले गेलेले असले तरी अशी काही झाडं त्यांनी लावलेली आहेत. काही जुनीही आहेतच. त्या बहरलेल्या झाडांची ही एक झलक. तुमच्या शहरांत पोहचलाय का हा बहर जरा पहा. आणि डोळ्यांसह मनाला आणि जीवालाही जरा रंगागंधांचा गारवा द्याच..

बहावा

महाराष्ट्राचं राज्यफुल हे. पाहिलंय ते कधी? घाटाघाटानं प्रवास करताना, डोंगर दऱ्यात तरी. निळसर जांभळा, जांभळा अशा रंगात फुलणारं ताम्हण पाहून किती सुख वाटतं ते पहायचं असेल तर हा उन्हाळा चुकवू नका. ताम्हण एकदा तरी जवळून पहाच.

Web Title: See these 6 trees, freak and miss a memorable summer trip!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.