गर्दीपासून दूर असलेल्या 'या' सुंदर ठिकाणांवर साजरा करा हनीमून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 14:36 IST2018-12-31T14:35:38+5:302018-12-31T14:36:30+5:30
नवी जोडपी हनीमूनसाठी एका चांगल्या रोमॅंटिक आणि शांत जागेचा शोध घेत असणार. त्यांचीच थोडी मदत करण्यासाठी आम्ही काही वेगळे हमीनून डेस्टिनेशन घेऊन आलो आहोत.

गर्दीपासून दूर असलेल्या 'या' सुंदर ठिकाणांवर साजरा करा हनीमून!
(Main Image Credit : www.hellotravel.com)
तशी तर भारतात फिरायला जाण्यासाठी हिल स्टेशनांची कमतरता नाहीये. हिल स्टेशन म्हटलं की, मनाली, शिमला, देहरादून ही नावे सर्वातआधी कुणाच्याही लक्षात येतात. पण या ठिकाणांपेक्षाही सुंदर अशी अनेक ठिकाणे भारतात आहेत. सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. अशात नवी जोडपी हनीमूनसाठी एका चांगल्या रोमॅंटिक आणि शांत जागेचा शोध घेत असणार. त्यांचीच थोडी मदत करण्यासाठी आम्ही काही वेगळे हमीनून डेस्टिनेशन घेऊन आलो आहोत. इथे तुम्हाला हवी असलेली शांतता तर मिळेलच सोबतच रोमॅंटिक वातावरणही मिळेल.
मेघामलाई
हे सुंदर हिल स्टेशन तामिळनाडूची शान मानलं जातं. चहाचे आणि वेलचीच्या सुंदर बागा येथील सुंदरतेत अधिक भर घालतात. मेघामलाईमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. हे ठिकाण हनीमून डेस्टिनेशनही परफेक्ट आहे.
जोरहाट
जोरहाटच्या आजूबाजूलाही चहाच्या बागांनी भरलेलं आहे. जोरहाट आसाममधील एक सुंदर ठिकाण आहे. जर तुम्ही काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये जाणार असाल तर इथे जायला विसरु नका. इथे तुम्हाला शांतता मिळेल.
कल्पा
कल्पा हे हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातील एक छोटं गाव आहे. इथे तुम्ही सुंदर सतलूज नदीला हिमालयाखालून वाहताना आणि किन्नोरच्या डोंगरातून जाताना बघू शकता. हनीमूनसाठी हे बेस्ट डेस्टिनेशन मानलं जातं.
हर की दून घाट
बद्रीनाथ धामजवळ गंधमादन पर्वतावर स्थित फुलांचा घाट किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असं याला म्हटलं जातं. उत्तरप्रदेशातील टांस घाटी हर की दून नावाने पर्यटकांमध्ये लोकप्रित होत आहे. येथील नैसर्गिक सौंदर्याच्या तुम्ही प्रेमात पडाल.
गावी
गावी हे ठिकाण केरळमधील इडूक्की जिल्ह्यात येतं. हा परिसर पेरियार टायगर रिझर्वचा आहे. त्यामुळे इथे येणे थोडं कठीण आहे. इथे येण्यासाठी परवानगीची गरज पडते. शहरातील धावपळीपासून दूर या ठिकाणी तुम्हाला वेगळीच शांतता मिळेल.
उनाकोटी
उनाकोटीच्या डोंगरांवर करण्यात आलेलं नक्षीकाम येथील सुंदर नजाऱ्यांपैकी एक आहे. येथील निसर्ग आणि वातावरण तुमच्या एकप्रकारे मोहिनी घातल्याशिवाय राहणार नाही. उनाकोटी हे त्रिपुरामधील एक सुंदर शहर आहे.