जीवघेणी ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग (बातमी जोड व बॉक्स)
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30
::अशी होते वाहतूक विस्कळीत

जीवघेणी ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग (बातमी जोड व बॉक्स)
:: शी होते वाहतूक विस्कळीत-कळमना ते कामठीकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. या क्रॉसिंगच्या दोन्हीकडे मोठ्या संख्येत शाळा व महाविद्यालये आहेत. -जवळच रेल्वेचा गिट्टी यार्ड आहे. येथील ट्रकचीही वाहतूक याच मार्गावरून होते. -कार्यालयीन वेळेत वाहनांची संख्या सर्वाधिक असते. -ग्रामीण भागातील ऑटोरिक्षाचालक प्रवासी बसविण्याच्या स्पर्धेत वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करतात.::समस्येच्या निराकरणासाठी उड्डाण पूल आवश्यक-समस्याच्या निराकरणासाठी या मार्गावर उड्डाण पूल आवश्यक आहे. परंतु तूर्तास तरी रेल्वे फाटक बंद ठेवण्याची वेळ कमी करावी.-कारण नसताना कळमना स्टेशनवर रेल्वे उभी करू नये.-वाहतूक पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी मिळून वाहतूक सुरळीत करावी.::नागरिक म्हणतात...-विद्यार्थ्यांचे करिअर संकटात या रेल्वे क्रॉसिंगच्या सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. माझ्या मुलीचा एमएससीचा पेपर होता. तिला परीक्षा केंद्रावर सोडायला जात होतो. क्रॉसिंगचे फाटक तब्बल ३० मिनिट बंद होते. मला जर आणखी उशीर झाला असता तर मुलीचे करिअर संकटात आले असते. या समस्येला घेऊन अनेकवेळा रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद झाले. परंतु समस्या आजही कायम आहे. - सुभाष बिश्वास, अध्यक्ष, स्वामी विवेकानंद बंगाली असोसिएशन-आंदोलनाचा इशारा क्रॉसिंगवरील वाहतुकीच्या कोंडीमुळे एका मुलाचा जीव गेला. रेल्वेला फक्त फाटक बंद करण्यापलिकडे काहीच दिसत नाही. यावर लवकरच उपाययोजना न झाल्यास आंदोलन उभे करण्यात येईल. - सुनील बनर्जी, उपाध्यक्ष, स्वामी विवेकानंद बंगाली असोसिएशन ...कोट...या क्रॉसिंगवर रेल्वे गाड्यांची गती ही एक समस्या आहे. रेल्वे आपले निश्चित स्थान गाठेपर्यंत फाटक बंद ठेवावे लागते. यामुळे समस्या निर्माण होते.-सचिन शर्मा, वरिष्ठ मंडळ परिचालन व्यवस्थापक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकोराडी पॉवर प्लांटच्या विस्तारानंतर कोळशाच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी मालगाड्यांची संख्याही वाढली आहे. - एस.के. गुप्ता, एडीआरएम, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे