इथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 16:46 IST2019-01-19T16:45:04+5:302019-01-19T16:46:44+5:30
प्राग युरोपमधील रोमॅन्टीक शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराचा समावेश जगभरातील सर्वात सुंदर शहरांमध्ये करण्यात येतो. अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकं असलेलं हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं.

इथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल
प्राग युरोपमधील रोमॅन्टीक शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराचा समावेश जगभरातील सर्वात सुंदर शहरांमध्ये करण्यात येतो. अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकं असलेलं हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. संगीत आणि कलात्मक गोष्टींचा वारसा लाभलेलं प्राग अनेक वास्तूशिल्प, बगिचे आणि उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे.
यूरोपमधील चेक रिपब्लिकमधील प्राग हे शहर आपल्या भव्यतेसाठी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीसाठी पर्यटकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. दरवर्षी इथे साधारण ४० लाख पर्यटक भेट देतात. कारण इथे फिरण्यासोबतच अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आणि त्याची सहभागी होण्याची संधी पर्यटकांना देतं.

जर तुम्हीही प्रागला भेट देणार असाल तर येथील प्रसिद्ध चार्ल्स ब्रिजला भेट द्यायला विसरू नका. हा प्रागमधील सर्वात जुना ब्रीज असून या ब्रीजवरून वल्तावा नदीवरील सुंदर दृश्य पाहता येतात. हा ब्रीज 1700 फुट लांब आहे. हा ब्रीज चार्ल्स चतुर्थ यांनी बांधला आहे. या ब्रीजव्यतिरिक्त तुम्ही प्रागमध्ये सेस्की क्रूमलोव कॅसल नक्की पाहा. प्राग शहराच्या मध्यावर 600 वर्ष जुनं घड्याळ असून आजही ते अगदी तंतोतंत वेळ दाखवत आहे.

प्राग पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे कारण येथे फिरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येथे वास्तूशिल्प, कलात्मक गोष्टी, शांत आणि हिरवेगार बगिचे, देशी बीयर, खाण्याच्या गोष्टी आणि शॉपिंग यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही या शहरामध्ये शाही महाल, कॅथेड्रल, चर्च, मठ, टॉवर आणि नक्षीकाम केलेले शहराचे रस्ते यांचा आनंद घेवू शकता.
