ट्रॅव्हलर असाल तर महाराष्ट्रातील 'या' शहराला अवश्य भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:12 IST2018-11-02T15:09:50+5:302018-11-02T15:12:30+5:30
अनेकदा एखाद्या ट्रिपचा प्लॅन म्हटलं की आपण महाराष्ट्राबाहेरील किंवा विदेशातील ठिकाणांचा विचार करतो. महाराष्ट्रातील शहरांबाबत झालचं तर मग मुंबई, पुणे यांसारख्या शहरांचाच विचार येतो.

ट्रॅव्हलर असाल तर महाराष्ट्रातील 'या' शहराला अवश्य भेट द्या!
अनेकदा एखाद्या ट्रिपचा प्लॅन म्हटलं की आपण महाराष्ट्राबाहेरील किंवा विदेशातील ठिकाणांचा विचार करतो. महाराष्ट्रातील शहरांबाबत झालचं तर मग मुंबई, पुणे यांसारख्या शहरांचाच विचार येतो. पण याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अनेक शहरं आहेत जिथे तुम्ही फिरण्यासाठी जाऊ शकता. अशाच महाराष्ट्रातील एका शहराबाबत सांगणार आहोत जे मुंबईपासून फक्त 400 किलोमीटर अंतरावर आहे. या शहराचं नाव सोलापूर असून ते जैन लोकांचं अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखलं जात असे.
तुळजापूर
सोलापूरमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत त्यापैकी अनेकांची पसंती तुळजापूरला असते. तुळजापूर महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. ज्या लोकांना आपल्या देशातील इतिहासाबाबत जाणून घ्यायचं असेल त्यांनी येथील वास्तूकला नक्की समजून घ्याव्यात. येथे इतिहासाशी संबंधित अनेक स्थळं आहेत. येथे प्राचीन काळांपासून असलेल्या गुहाही आहेत. त्याचप्रमाणे हे तिर्थक्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं. इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता.
बागलकोट
सोलापूरपासून अगदी जवळ असलेल्या कर्नाटकातील बागलकोटमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता. हे ठिकाण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचं प्राचीन नाव बगाडिगे असं होतं. याचा संबंध पौराणिक काळाशीही जोडण्यात येतो. असं सागंण्यात येतं की हे शहर रावणाने एका भजनमंडळींना दिलं होतं. या शहरावर अनेक शक्तीशाली राजांनी राज्य केलं असून त्यामध्ये पेशवा, म्हैसूर, मराठा, विजयनगर आणि इंग्रजांचाही समावेश आहे. येथे अनेक प्रेक्षणिय स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता. ज्यामध्ये प्राचिन जैन मंदिरं, विरुपाक्ष मंदिर, बादामी गुहा, रावणपहाडी गुहा, पुरातत्व संग्रहालय यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे.
चंदोली नॅशनल पार्क
सोलापूरमध्ये एक नावाजलेलं नॅशनल पार्क आहे. येथे वर्षभर अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या नॅशनल पार्कचे क्षेत्रफळ 317.67 वर्ग किलोमीटर आहे. येथे अनेक वन्यजीव, दुर्मिळ झाडं, पक्षी तुम्ही पाहू शकता. जंगलातील जीवन येथे तुम्हाला अनुभवण्यास मिळते.
विजापूर
सोलापूरपासून जवळ असलेल्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी विजापूर एक आहे. विजापूरला अनेक लोक बिजापूर म्हणून ओळखतात. हे शहर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. येथे अनेक प्राचीन मंदिरं, किल्ले, जामिया मस्जिद, इब्राहिम रौजाचा मकबरा, मेहतर महाल, सात मंजिल, ताज बावडी, गोल गुंबज, नारी महल, मलिक-ए-मैदान इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता. येथील मुख्य आकर्षण विजापूरचा किल्ला. जे आदिलशहाच्या रजवटिदरम्यान बांधण्यात आला होता.