पन्ना नॅशनल पार्क, हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 02:46 PM2018-11-01T14:46:03+5:302018-11-01T14:49:29+5:30

दिवाळीत उत्सव साजरा करण्यासोबतच सुट्टीमध्ये अनेकजण काही दिवस फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात.

Panna National Park in Madhya Pradesh best destination to visit in winter | पन्ना नॅशनल पार्क, हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन!

पन्ना नॅशनल पार्क, हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन!

Next

दिवाळीत उत्सव साजरा करण्यासोबतच सुट्टीमध्ये अनेकजण काही दिवस फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात. कमीत कमी वेळात फिरून येता येईल अशा ठिकाणांचा अशावेळी अनेकजण शोध घेत असतात. तुम्हीही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल आम्ही कमी खर्चात तुमच्यासाठी काही खास डेस्टिनेशनची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांवर तुम्ही थंडीच्या दिवसातील सुट्टी मनमुरादपणे एन्जॉय करु शकता. 

मध्यप्रदेशातील पन्ना नॅशनल पार्क वाघांचं दर्शन होण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे जंगल दाट झाडी, डोंगरदऱ्यांनी घेरलं गेलं आहे. इथे केवळ वाघच नाही तर इतरही प्राणी आणि पक्षी बघण्यासाठी इथे पर्यटकांची गर्दी जमलेली असते. व्याघ्र प्रकल्पासोबतच इथे पांडव फॉल्स, रानेह फॉल्स आणि केन घडियाल अभयारण्याही बघण्यासारखं आहे. 

काय आहे इथे खास?

वाघांसोबत पन्ना नॅशनल पार्कमध्ये जंगली मांजरी, एंटीलोप, गिधाडे, लांडगे, चिंकारा असेही प्राणी सहज बघायला मिळतात. ५४२.६७ वर्ग किमी परिसरात केन नदीच्या दोन्ही बाजूंनी असलेलं हे जंगल दाट झांडांनी वेढलेलं आहे. थंडीच्या दिवसात तर इथे परदेशी पक्षीही बघायला मिळतात. यात पॅराडाइज़ फ्लायकॅचर, व्हाइट नेक स्टॉर्क, डव, बेयर हेडेड गूज़, मीनीवेट्स, ब्लॅक ड्रोंगो, बुलबुल, किंगफिशर्स, इंडियन रोलर, ब्राउन फिश आउट इत्यादी पक्षांचा समावेश आहे.

नॅशनल पार्कमध्ये सफारीचा आनंद

नॅशनल पार्क बघण्याचे दोन पर्याय आहेत आणि दोन्ही शानदार आहेत. जीप सफारी ही कॉमन आहे पण याने तुम्ही जास्तीत जास्त जंगलाची सफारी करु शकता. दुसरा पर्याय आहे हत्ती. हत्तीवरुन वाघांना बघण्याचा मजा काही औरच असेल. दिवसातून दोनदा जंगल सफारी करण्याची संधी मिळते. एकदा सकाळी आणि दुसऱ्यादा दुपारी. सायंकाळी प्राणी जास्त अॅक्टिव राहतात त्यामुळे त्यावेळी जंगलात फिरणे आणि फोटोग्राफी करणे जास्त बेस्ट ठरते. 

कधी जावे?

पन्ना नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ बेस्ट आहे. कारण यादरम्यान वातावरण चांगलं असतं आणि तुम्ही केन नदीमध्ये बोटींगचाही आनंद घेऊ शकता. त्यासोबतच पांडव गुहाही या दिवसात बघण्यात मजा येते.

कसे पोहोचाल?

विमान मार्ग - खजुराहो येथे पोहोचण्यासाठीही सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. येथून नॅशनल पार्कचं अंतर ४५ किमी आहे. त्यासोबतच जबलपूर एअरपोर्ट येथूनही तुम्ही नॅशनल पार्कला येऊ शकता. येथून हे अंतर २५० किमी आहे. 

रेल्वे मार्ग-  सतना येथील जवळचं रेल्वे स्टेशन आहे. येथून सर्वच मोठ्या शहरांसाठी रेल्वे आहेत. 

रस्ते मार्ग - रस्ते मार्गाने पन्ना नॅशनल पार्कला पोहोचणे सर्वात सोपे आहे. खजुराहो, सतना आणि काही मोठ्या शहरांमधून इथे जाण्यासाठी सतत बसेस असतात. 
 

Web Title: Panna National Park in Madhya Pradesh best destination to visit in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.