१८व्या शतकात २ कोटी रूपयांना तयार केलेला हा किल्ला आज आहे लक्झरी हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 16:25 IST2018-07-19T16:22:05+5:302018-07-19T16:25:22+5:30
जगाच्या पाठीवर अशा अनेक जागा आहेत ज्यांचं काहीना काही ऐतिहासिक महत्व राहिलं आहे. असाच एक ऐतिहासिक किल्ला आहे ज्याचं रुपांतर आता एका हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे.

१८व्या शतकात २ कोटी रूपयांना तयार केलेला हा किल्ला आज आहे लक्झरी हॉटेल
जगाच्या पाठीवर अशा अनेक जागा आहेत ज्यांचं काहीना काही ऐतिहासिक महत्व राहिलं आहे. असाच एक ऐतिहासिक किल्ला आहे ज्याचं रुपांतर आता एका हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे.
१८८० मध्ये तयार केला होता हा किल्ला
इंग्लंडच्या सोलेंट सिटीमध्ये नो मॅन लॅन्ड फोर्ट हा एक समुद्री किल्ला आहे. हा किल्ला इंग्लंडच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या आयलंड ऑयसल ऑफ विटच्या किनाऱ्यावर २.२ किमीच्या अंतरावर आहे. या किल्ल्याचं निर्माण करण्याचा प्रस्ताव १८५९ च्या रॉयल कमिशनने मंजूर केला होता. नंतर १८६७ ते १८८० दरम्यान याचं निर्माण झालं.
२००४ मध्ये एका चॅनेलने दाखवलेल्या रिपोर्टनुसार, या किल्ल्यातील पाण्यामध्ये घाण मिळाली होती. त्यानंतर किल्ला बंद करण्यात आला. हा किल्ला बंद करण्यात आल्यानंतर इथे काही पक्षांनी आपलं घर तयार केलं.
२००५ मध्ये हा किल्ला विकण्यात आला. त्यानंतर या किल्ल्यात काहीच काम करण्यात आलं नाही. या किल्ल्याची बोली लावली जाऊ लागली होती. त्यानंतर २०१५ मध्ये या किल्ल्याला एका लक्झरी हॉटेलमध्ये बदलण्यात आलं.
२ कोटींमध्ये तयार केला होता किल्ला
क्रिमियन वॉरनंतर नेपोलियन तिसऱ्याने हल्ल्याची शक्यता असल्याने जवळपास २ कोटींपेक्षा जास्त पैस लावून हा किल्ला तयार केला होता. पोर्ट्समाऊथची सुरक्षा करण्यासाठी हा किल्ला तयार करण्यात आला होता. इंग्लंडच्या नौदलाचं पोर्ट तयार करण्यात आलं.