शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

हिमाचल प्रदेशातील बीर गाव तुम्हाला घेवून जातं तुमच्या स्वप्नातल्या गावात. पावसाळ्यात हे गाव चुकवू नकाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 6:22 PM

पाच हजार फूट उंचावर वसलेलं बीर गाव. शहरातल्या धकाधकीपासून दूर जाऊन मान्सूनचा आनंद घेण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे.

ठळक मुद्दे* हिमाचल प्रदेशातल्या कांग्रा जिल्ह्यातलं तिबेटी निर्वासितांच छोटंसं गाव ‘बीर’.* बीरमध्ये केवळ निसर्गसौंदर्यच नाही तर अध्यात्मिक शांतीही मिळते. या गावात एक नाही तर पाच बौद्ध विहार आहेत.* बीरमधलं तिबेटीयन खाणं तिथल्या संस्कृतीची ओळख सांगणार आणि अगदी घरगुती चवीचं.

- अमृता कदमसकाळी उठल्यावर खिडकीचा पडदा सरकवल्यावर समोर दिसणाºया हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा, हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर झुकलेले काळे ढग आणि अनपेक्षितपणे तुमच्या चेहर्यावर उडालेले पावसाचे थेंब. स्वप्नातलं वाटावं असं हे दृश्य आहे ना? पण हे स्वप्न तुम्ही वास्तवात अनुभवू शकता.

 

 

हिमाचल प्रदेशातल्या कांग्रा जिल्ह्यातलं तिबेटी निर्वासितांच छोटंसं गाव ‘बीर’. हे गाव तुम्हाला ‘सपनों के देस’ मध्ये घेवून जातं. पाच हजार फूट उंचावर वसलेलं हे गाव शहरातल्या धकाधकीपासून दूर जाऊन मान्सूनचा आनंद घेण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे. सगळ्या कृत्रिमतेपासून एकदम अस्पिर्शत असं हे गाव आहे. 

सकाळी उठल्यावर आणि स्प्रूसच्या वृक्षांमधून सळसळणार्या  वार्यासोबतच पक्षांचा किलबिलाट तुम्हाला प्रसन्न करतो. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर मातीचा मंद सुगंध परत एकदा आपल्याला मातीशी जोडतो.बीरमध्ये केवळ निसर्गसौंदर्यच नाही तर अध्यात्मिक शांतीही मिळते. या गावात एक नाही तर पाच बौद्ध विहार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली आणि या विहारांमधली सुंदर पेंटिग्ज पहायची असतील तर या विहारांना भेट दिलीच पाहिजे. बीरपासून 11 किलोमीटर अंतरावर पालपंग शेब्लिंग विहारही आवर्जून पाहण्यासारखा आहे.

खरंतर बीर हे पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. मान्सूनमध्ये पॅराग्लायडिंग पूर्णपणे बंद असतं. पण पॅराग्लायडिंंगसाठी ओळखल्या जाणार्या बिलिंगला मात्र नक्की जा. कारण इथल्या उंचावरु न संपूर्ण कांग्रा व्हॅलीचं दर्शन होतं. हे दृश्य तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडतं.संध्याकाळी या ठिकाणी आकाशात रंगांची उधळण होते. पाऊस थांबल्यावर आकाश स्वच्छ निळं होतं. आणि सूर्य मावळताना गुलाबी-तपकिरी रंगाच्या छटा आकाशात पसरतात. आणि सरतेशेवटी काळ्या आकाशात चमकणारे तारे !

बीरमधली अजून एक गोष्ट आहे जिचा उल्लेख करायलाच हवा ते म्हणजे इथलं खाणं-पिणं. इथे अत्यंत रु चकर आणि पारंपरिक पद्धतीचं तिबेटीयन खाणं मिळतं. उंची, महागड्या रेस्टॉरण्टपेक्षा जर तुम्हाला साधं, पण तिथल्या संस्कृतीची ओळख सांगणारं, घरगुती पद्धतीचं जेवण आवडत असेल तर बीर तुम्हाला निराश नाही करणार. इथले स्थानिक लोक तुमच्या आदरितथ्यासाठी उत्सुक असतात. नूडल्स घालून केलेलं ‘थेंथुक’ नावाचं सूप पावसात भिजून आल्यावर आतून-बाहेरु न ऊबदार करेल. राइस आणि नूडल्सऐवजी तिंग्मो नावाचा स्टीम्ड बन तुम्ही कोणत्याही मेन कोर्ससोबत मागवू शकता. इतरही अनेक पदार्थ आहेत, ज्यांचा आस्वाद तुम्ही बीरमध्येच घेऊ शकता.

अजूनही मान्सूनचा दीड महिना मुक्काम आहे. तोपर्यंत एकदा आवर्जून हिमाचल प्रदेशमधल्या या गावाला जाऊन या. इथले चार-पाच दिवस तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांसाठी भरपूर ऊर्जा देतील हे नक्की!