मोहिनी घालणारा निसर्गाचा नजारा बघायचा असेल तर भेट द्या 'चांगलांग'ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 13:07 IST2019-05-07T13:06:11+5:302019-05-07T13:07:30+5:30
आज आम्ही तुम्हाला अरूणाचलच्या चांगलांगमधील काही वेगळ्या ठिकाणांबाबत सांगणार आहोत. इथे तुम्ही सुट्टी मनमुरादपणे एन्जॉय करू शकता.

मोहिनी घालणारा निसर्गाचा नजारा बघायचा असेल तर भेट द्या 'चांगलांग'ला!
(Image Credit : HelloTravel)
अरूणाचल हे राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात लोकप्रिय आहे. इथे सगळीकडे सुंदर डोंगर आणि खळखळून वाहणारं पाण्याचं संगीत कुणालाही आपल्याकडे आकर्षित करेल. इतकेच नाही तर अरूणाचल प्रदेशातील टायगर रिझर्व्ह सुद्धा सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. तसेच इतिहासातील अनेक गोष्टी इथे बघायला-ऐकायला मिळतात. अशात जर तुम्ही सुद्धा निसर्गप्रेमी असाल तर अरूणाचल प्रदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आज आम्ही तुम्हाला अरूणाचलच्या चांगलांगमधील काही वेगळ्या ठिकाणांबाबत सांगणार आहोत. इथे तुम्ही सुट्टी मनमुरादपणे एन्जॉय करू शकता.
'मियाओ'च्या पडाल प्रेमात
चांगलांगमध्ये नोआ-देहिंग नदी किनाऱ्यावर मियाओ आहे. या ठिकाणाला तिबेटच्या शरणार्थ्यांचं घरही म्हटलं जातं. इथे नदीमुळे सगळीकडे हिरवीगार झाडी आणि निसर्ग सौंदर्य आहे. तसेच हा परिसर व्यवसायाच्या दृष्टीनेही समृद्द मानला जातो.
लेक ऑफ नो रिटर्न
चांगलांगमधील 'लेक ऑफ नो रिटर्न' चा इतिहास या नावाप्रमाणेच अनोखा आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान या तलावात अनेक विमाने बुडाली होती. त्यामुळेच या तलावाचं नाव लेक ऑफ नो रिचर्न असं आहे.
नामदफा नॅशनल पार्क
नामदफा नॅशनल पार्कला भारत सरकारने १९८३ने टायगर रिझर्व्ह घोषित केलं होतं. डोंगरांमध्ये असलेल्या या पार्कची सुंदरता मोहिनी घालणारीच आहे. इथे वाघांसोबतच अस्वल, जंगली बिबटे आणि हत्ती बघायला मिळतात.