शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Special : पावसाळ्यात राज्याबाहेरील या ठिकाणांना द्या आवर्जून भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 12:55 IST

अनेकांना या दिवसात राज्याबाहेर जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंद घ्यायचा असतो.

पावसाला सुरुवात झाली की, फिरण्याची आवड असणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. अनेकांना या दिवसात राज्याबाहेर जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंद घ्यायचा असतो. जर तुम्हीही अशाच काही खास ठिकाणांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पर्याय सांगत आहोत. 

1) कोडायकनाल

तामिळनाडूमधील दिनदीगुल डोंगरांच्या मधोमध कोडायकनाल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे चारही बाजूंनी केवळ हिरवळ बघायला मिळते. पावसाळ्यात तर या ठिकाणी फारच सुंदर नजारा असतो. जर तुम्हाला अशा ठिकाणाचा शोध असेल तर इथे नक्कीच जाऊ शकता. 

2) देवरिया ताल

उत्तराखंडमधील मस्तुरा आणि सारी गावांजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथून दिसणारा नजारा बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी असते. या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवी. 

3) मुन्नार

(Image Credit: www.munnar.com)

केरळमधील पावसाळा किती सुंदर आणि आकर्षक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. केरळमधील मुन्नारला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याची वाट पाहतात. कारण पावसाळ्यात इथे येऊन तुम्ही तुमच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवू शकता. 

4) बिष्णुपूर

(Image Credit: www.trekearth.com)

पश्चिम बंगालच्या बंकुरा जिल्ह्यात हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नजारा मनमोहक असतो. येथील मंदिरे आणि डोंगर तुम्हाला कधीही न अनुभवलेला अनूभव देतील. 

5) जीरो

(Image Credit: www.nativeplanet.com)

अरुणाचल प्रदेशातील जीरो या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर गावांमध्येही या गावाचा समावेश आहे. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला कोणताच ऋतू असू शकत नाही. 

6) उदयपूर

उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोकह वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटनMonsoon Specialमानसून स्पेशल