(Image Credit : MakeMyTrip)
कारगिलचं नाव येतं तेव्हा आपल्या सर्वांना भारत आणि पाकिस्तानामध्ये 1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्या आठवणी जाग्या होतात. पण कारगिल फक्त भारत आणि पाकिस्तानमधील युद्धांसाठीच नाहीतर पर्यटनासाठीही ओळखलं जातं. जर तुम्हाला अॅडव्हेंचर्सचा अनुभव घ्यायचा असेल तर कारगिल बेस्ट डेस्टिनेशन ठरतं. कारगिल श्रीनगरपासून साधारण 205 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तुम्हाला माहीत आहे का? कारगिल लेह आणि श्रीनगरच्या मध्ये वसलेलं असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना लेह आणि श्रीनगर या दोन्ही ठिकाणांवरील सौंदर्याचा अनुभव घेता येतो.
अॅडव्हेचर्स ट्रिपसाठी लोकप्रिय ठिकाण
आपल्या भौगोलिक परिस्थितीमुळे कारगिल अॅडव्हेंचर्स ट्रिपसाठी प्रसिद्ध आहे. कारगिलला गेल्यानंतर तुम्ही माउंटेनियरिंग, ट्रॅकिंग आणि रिवर राफटिंगसारख्या अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. सुरू आणि द्रास व्हॅलीच्या आजुबाजूला दिवसभर ट्रेकिंग करण्यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत.
या गोष्टी लक्षात ठेवा
कारगिलमध्ये ट्रिपसाठी जाण्याआधी तेथील वातावरण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. थंडीमध्ये अनेकदा बर्फवृष्टी होते आणि तापमान फार कमी होतं. उन्हाळ्यामध्ये कारगिलमध्ये जाण्याचा प्लॅन अगदी उत्तम असतो. मे आणि जून दरम्यानचा काळ कारगिल फिरण्यासाठी बेस्ट ठरतो.
असं पोहोचा कारगिल...
रस्तेमार्गाने कारगिलपर्यंत अगदी सहज पोहोचता येतं. कारगिलजवळील एअरपोर्ट म्हणजे, श्रीनगर एअरपोर्ट. तसेच कारगिलजवळील रेल्वे स्टेशन म्हणजे, जम्मू तवी रेल्वे स्टेशन जे जवळपास 500 किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू तवी रेल्वे स्टेशन देशातील अनेक शहरांशी जोडलेलं आहे. याव्यतिरिक्त गाडीनेही जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला टॅक्सी किंवा जिप रेन्टनेही मिळतील. तसेच लेह आणि श्रीनगरपासून कारगिल जाण्यासाठी बस सेवाही उपलब्ध आहेत.