न्यू ईअरचं सेलिब्रेशन करा गोव्यात; फक्त 400 रूपयांत ठरवा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 14:56 IST2018-12-20T14:50:12+5:302018-12-20T14:56:34+5:30
सध्या ख्रिसमस आणि न्यू ईअरचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. ईयर एन्डिंग आणि भरपूर सुट्ट्या यांमुळे अनेकजण सध्या फिरायला जाण्याची तयारी करत आहेत. अशातच तुम्ही जर एखाद्या बजेट ट्रिपसाठी डेस्टिनेशन सिलेक्ट करत असाल तर तुम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन करू शकता.

न्यू ईअरचं सेलिब्रेशन करा गोव्यात; फक्त 400 रूपयांत ठरवा प्लॅन
सध्या ख्रिसमस आणि न्यू ईअरचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. ईयर एन्डिंग आणि भरपूर सुट्ट्या यांमुळे अनेकजण सध्या फिरायला जाण्याची तयारी करत आहेत. अशातच तुम्ही जर एखाद्या बजेट ट्रिपसाठी डेस्टिनेशन सिलेक्ट करत असाल तर तुम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन करू शकता. अनेकदा न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी सर्वांच्या पसंतीचं ठिकाण म्हणजे गोवा. काही लोकांना गोव्याला जाण्याची इच्छा असतेच, पण खर्चाचा विचार करून ते न्यू ईअरसाठी इतर ठिकाणांना पसंती देतात. परंतु आता खर्चाचं टेन्शन सोडा आणि बिनधास्त न्यू ईअरसाठी गोवा ट्रिप प्लॅन करा. कारण आता आयआरसीटीसी फक्त 400 रूपयांमध्ये गोवा फिरण्याची संधी देत आहे.
आयआरसीटी पर्यटकांसाठी फक्त आणि फक्त 400 रूपयांत गोवा टूर ऑफर करत आहे. 'हॉप ऑन हॉप ऑफ गोवा बाय बस' नावाच्या पॅकेजमध्ये ही टूर पर्यटकांसाठी ऑर्गनाइझ करण्यात येणार आहे. एका दिवसाच्या या पॅकेजमध्ये पर्यटक नॉर्थ गोवा किंवा साउथ गोवा यांपैकी पर्याय निवडू शकतात. तुम्हाला नॉर्थ गोवा किंवा साउथ गोवा फिरण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 400 रूपये प्रति व्यक्ती मोजावे लागणार आहेत. तसेच जर तुम्हाला नॉर्थ आणि साउथ गोवा दोन्ही फिरण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला 600 रूपये प्रति व्यक्ती मोजावे लागणार आहेत.
गोवा ट्रिपदरम्यान गोव्यातील महत्त्वपूर्ण दर्शनीय स्थळं फिरण्याची संधी देण्यात येणार आहे. नॉर्थ गोव्याच्या टूरमध्ये साउथ सेंट्रल गोवा, गोवा सायन्स म्युझिअम, कला अॅकॅडमी, भगवान महावीर गार्डन यांसारख्या पर्यटन स्थळांवर फिरता येणार आहे. तसेच साउथ गोव्याच्या ट्रिपमध्ये फोर्ट, सिंकेरिम बीच/फोर्ट, सेंट ऐंटनी चॅपल, सेंट अॅलेक्स चर्च इत्यादी ठिकाणं फिरता येणार आहे. या ट्रिपचं पॅकेज बुक करण्यासाठी आयआरसीटीसीच्या ऑफिशिअल वेबसाइटवर जाऊ शकता.