परदेशी पर्यटन स्थळांपेक्षा कमी नाहीत उत्तराखंडमधील ही ६ ठिकाणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 13:27 IST2019-03-04T13:19:03+5:302019-03-04T13:27:30+5:30
जर तुम्हालाही परदेशातील वेगवेगळी सुंदर पर्यटन स्थळे बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही इच्छा भारतातही पूर्ण करू शकता. परदेशातील वेगवेगळ्या लोकप्रिय डेस्टिनेशनपेक्षाही सुंदर ठिकाणे भारतात बघायला मिळतात.

परदेशी पर्यटन स्थळांपेक्षा कमी नाहीत उत्तराखंडमधील ही ६ ठिकाणे!
जर तुम्हालाही परदेशातील वेगवेगळी सुंदर पर्यटन स्थळे बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही इच्छा भारतातही पूर्ण करू शकता. परदेशातील वेगवेगळ्या लोकप्रिय डेस्टिनेशनपेक्षाही सुंदर ठिकाणे भारतात बघायला मिळतात. त्यातील एक म्हणजे औली.
उत्तराखंडमधील औली ठिकाणाला भारताचं मिनी स्वित्झर्लॅंड म्हटलं जातं. इथे चांगला टाइम स्पेंट करण्यासाठी देशातूनच नव्हे कर परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. केवळ हिवाळ्यातच नाही तर वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते. बर्फाची पांढरी चादर गुंडाळून उभे असलेले डोंगर, तसेच सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत इथे सगळंच बघण्यासारखं असतं. हे ठिकाण स्कीइंगसाठी फार प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला 'बुग्याल' सुद्धा म्हटलं जातं.
देवप्रयाग
उत्तराखंडमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे देवप्रयाग. असे मानले जाते की, जेव्हा राजा भागीरथाने गंगेला पृथ्वीवर उतरण्यासाठी तयार केलं, तेव्हा गंगेसोबत ३३ कोटी देव सुद्धा स्वर्गातून देवप्रयागमध्ये उतरले. इथे तुम्ही वेगवेगळे धार्मिक स्थळे बघण्यासोबतच नैसर्गिक सौंदर्याचा सुद्धा आनंद घेऊ शकता. देवप्रयाग हे ऋषिकेशपासून ७० किमी अंतरावर आहे. इथे अलकनंदा आणि भागीरथी नद्यांचा पवित्र संगम आहे.
५०० पेक्षा जास्त व्हरायटीचे फूल
८७.५० किमी परिसरात पसरलेल्या फुलांच्या घाटाला बघून कुणीही थक्क होतं. या ठिकाणाला यूनेस्कोने १९८२ मध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित केले होते. फुलांच्या घाटीमध्ये जुलै ते ऑक्टोबरच्या मध्यात ५०० पेक्षा जास्त प्रजातीचे फूलं उमलतात. खास बाब ही आहे की, १५ दिवसात वेगवेगळ्या रंगांचे फूल फुलत असल्याने घाटाचा रंगही बदलून जातो.
बर्फाचे डोंगर तपोवनमधून...
तपोवनचा सुंदर नजाराही तुमच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. काही वेळ इथे घालवल्यावर तुम्ही सगळंकाही विसरून येथील निर्सगाच्या कुशीत आपोआप शिराल. त्यासोबतच नंदनवनातून शिवलिंग, भागीरथी, केदार डोम, थलय सागर आणि सुदर्शनसारखे डोंगरही बघू शकता. तसेच इथे ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.
तलाव आणि डोंगरांनी वेढलेलं भीमताल
तलाव आणि डोंगरांची तुम्हाला आवड असेल तर भीमताल हिल स्टेशनला नक्की भेट द्या. भीमतालमध्ये सात तलावांचा एक समूह आहे. याला सातताल असं म्हटलं जातं. डिसेंबर ते एप्रिल दरम्यान हे हिल्स स्टेशन फिरण्यासाठी बेस्ट मानलं जातं. तुम्ही इथे सुंदर डोंगर आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता. येथील तलावांमध्ये बोटींगही करतात.
मुक्तेश्वर
डिसेंबर महिन्यात इथे पहिल्यांदा बर्फवृष्टी होते. जी फेब्रुवारी ते मार्चपर्यंत कायम असते. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे गर्दी करतात.