शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ झाले पण फायदा काय.. सेवा सुरू नसल्याने दुर्लक्ष : दर्शनी भागात गवताचे जंगल, कोट्यधीची गुंतवणूक पण फायदा नाही

By admin | Updated: September 23, 2016 00:47 IST

जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते.

जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते.
जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ ३०३ हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या कामाला १९७३ मध्ये प्रारंभ झाला होता. विमानतळाचे हे काम भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले. एकाचवेळी ७२ आसन क्षमता असलेले दोन विमाने उतरू शकतील. अशी रचना या विमानतळाची आहे.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. विमानतळ झाले, त्याचे लोकार्पणही झाले. मात्र पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणार्‍या कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत आला आहे. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षांपूर्वी संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सर्वेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजलविली.
विविध सुविधा
विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे कामासाठी ६१ कोटींची निधी मिळाला होता व उर्वरित कामांसाठी ६३ कोटींचा निधी मंजूर होता. प्राप्त निधीतून विमानतळावर विविध कामे पूर्ण झालेली आहेत. यात प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे. या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊर्जेवर चालणार आहेत. प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. सध्या असलेली १७०० मीटर लांब व ४५ मीटर रुंदीची धावप˜ी येथे तयार असून सेवा सुरू होऊन प्रतिसाद मिळू लागल्यावर भविष्यात धावप˜ी विस्तारित करण्याचाही प्रस्ताव होता. हे काम झाल्यावर जळगावला बोईंग जातीचे विमानदेेखील उतरू शकेल असे नियोजन होते. विमान उतरल्यानंतर ते ॲप्रनवर येईल. तिथून प्रवाशांना टर्मिनलपर्यंत आणण्यासाठी चारचाकी वाहने ठेवण्यात येतील त्या दृष्टीनेही कामे झालेली असल्याने सुसज्ज असे विमानतळ जळगावात असताना सद्य स्थितीत ते केवळ देखावा ठरत आहे.
-------