भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:16 PM2020-02-13T17:16:29+5:302020-02-13T17:20:58+5:30

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल

Find which beaches in India are good best before visiting | भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!

भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!

Next

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल. पण त्या आधी भारतातील कोणते बीच चांगले आहेत . कोणते घाणेरडे आहेत. हे समजणं सुद्धा तितकंच गरचेचं आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला भारतातील चांगल्या आणि अस्वच्छ असलेल्या दोन्ही बीचची माहिती देणार आहोत. 

केरळमधिल कझाकुट्टम बीच हा भारतातील सगळ्यात जास्त स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

ओडिशाचा पुरी बीच  हा सुद्धा स्वच्छ आहे. समुद्रकिनारी मजा घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

तिरुवनमइयुर बीच हा तामिळनाडू मधिल तिसरा सगळ्यात साफ आणि स्वच्छ असलेला बीच आहे. 

गोपालपुर बीच, ओडिशाच्या बेरहमपुर येथुन  १६ किमी  अंतरावर असलेला हा बीच सगळ्यात स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

गुजरातमधील सुरत शहरातील डुमस बीचची गणती सगळ्यात सुंदर आणि रॉमॅंन्टिक बीचमध्ये होते. हा बीच जितका चांगला आहे. तेवढाच भयावह सुद्धा आहे.


केरल का कोझिकोड बीच सगळ्यात घाणेरडा आहे.

महाराष्ट्रातील सुद्धा अनेक बीच असे आहेत जे स्वच्छतेच्या बाबतीत खूपचं मागे आहेत. सागरेश्वर बीच हा खूपच घाणेरड्या अवस्थेत आहे.

मुंबईतीलजवळ असलेल्या वसईत असलेला  अर्नाळा बीच हा सगळयात घाण असवस्था असलेल्या बीचपैकी एक आहे. ( हे पण वाचा-आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...)

भारतातील सगळ्यात अस्वच्छ असलेल्या बीचमध्ये तामीळनाडूतील वेदरण्यम बीच चौथ्या क्रमांकावर आहे. जर बीचचा आनंद घ्यायला जात असलेल्या पर्यटकांनी स्वच्छतेचे भान राखले तर कदाचीत हे बीच पुन्हा चांगले आणि पर्यटनास योग्य ठरू शकतात.  ( हे पण वाचा-काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!)

Web Title: Find which beaches in India are good best before visiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.