शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

पृथ्वीवरच्या देवभुमीतील डोळे दिपवुन टाकणारी पर्यटनस्थळे पाहिली का? आजच जाणून घ्या कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 20:07 IST

अलौकिक निसर्गसौंदर्यामुळे केरळला देवभूमी असंही म्हटलं जातं. केरळमध्ये पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत. परंतु, त्यात पाच ठिकाणं अशी आहेत, तिथं प्रत्येकानं आवर्जून गेलंच पाहिजे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात निवांतपणाचे दोन क्षण अनुभवण्यासाठी पर्यटन, सहलीचा पर्याय निवडला जातो. निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकंती करणं, ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना भेटी देणं, घनदाट जंगलात किंवा समुद्रकिनारी मुशाफिरी करणं प्रत्येकाला आवडतं. देशात पर्यटनासाठी (Tourism) अनेक सुंदर स्थळं आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून गुजरातपर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी तुम्ही पर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

आज आम्ही तुम्हाला एका सुंदर राज्यातल्या काही प्रमुख पर्यटनस्थळांची (Tourist Destination) माहिती देणार आहोत. केरळ (Kerala) हे नाव उच्चारताच सुंदर समुद्र किनारे, समृद्ध बॅकवॉटर्स आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं डोळ्यासमोर येतात. अलौकिक निसर्गसौंदर्यामुळे केरळला देवभूमी असंही म्हटलं जातं. केरळमध्ये पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत. परंतु, त्यात पाच ठिकाणं अशी आहेत, तिथं प्रत्येकानं आवर्जून गेलंच पाहिजे.

टाइम मासिकाच्या (Time Magazine) 2022 च्या जगातल्या सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत केरळचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. या यादीत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण अशा 50 ठिकाणांचा समावेश असून, त्यात केरळलादेखील स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या नैर्ऋत्य किनारपट्टीवर असलेलं केरळ हे सर्वांत सुंदर राज्यांपैकी एक आहे. आल्हाददायक समुद्रकिनारे, सुंदर बॅकवॉटर्स, देखणी मंदिरं आणि दिमाखदार राजवाडे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे या राज्याला देवभूमी असं म्हटलं जातं, असं 'टाइम'ने म्हटलं आहे. केरळ हे भारतीय आणि परदेशी पर्यटकांसाठी अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या राज्यात पाच विशेष लोकप्रिय ठिकाणं आहेत, जिथं प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे. त्यांची माहिती घेऊ या

केरळच्या सागरी इतिहासात अलप्पुझाला (Alappuzha) महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे `पूर्वेचं व्हेनिस` अशी अलप्पुझाची ओळख आहे. बोटींच्या शर्यती, बॅकवॉटर हॉलिडे, समुद्रकिनारे आणि सागरी उत्पादनांसाठी ते विशेष प्रसिद्ध आहे. अलप्पुझामधल्या हाउसबोट क्रूझ (Houseboat Cruise) आनंददायी अनुभव देतात. या क्रूझमध्ये सुसज्ज बेडरूम, आधुनिक टॉयलेट, आरामदायी लिव्हिंग रूम, स्वयंपाकघर, मासेमारीसाठी बाल्कनी अशा सर्व सुखसोयींनी सज्ज हॉटेल रूम्स असतात. या हाउसबोटमध्ये राहून तुम्ही बॅकवॉटरचा अवर्णनीय आनंद घेऊ शकता.

वायनाडमधल्या (Wayanad) काबिनी नदीच्या मध्यभागी असलेला बेटांचा समूह कुरुवाद्वीप (Kuruvadweep) किंवा कुरुवा म्हणून ओळखला जातो. बांबूच्या तराफ्यावर म्हणजेच बोट राइडसाठी हा भाग विशेष लोकप्रिय आहे. या दुर्गम स्थळी निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. ट्रेकिंगप्रेमींना तिथल्या सुंदर आणि नैसर्गिक पायवाटा विशेष खुणावतात. नदीशेजारची घनदाट झाडी तर पिकनिकसाठी योग्य ठिकाण आहे. बेटाच्या विलोभनीय सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूचे प्रवाह बोट राइड (Boat ride) किंवा राफ्टिंगसाठी आदर्श आहेत.

बेपोर (Beypore) हे कोळिकोडेमधलं एक प्रसिद्ध बंदर आहे. कयाकिंग, कनूइंग, वॉटर पोलो, पॅरासेलिंग, स्पीड बोट रेसिंग, वॉटर स्कीइंग, पॉवर बोट रेसिंग, यॉट रेसिंग, वुडन लॉग रेसिंग आणि टिंबर राफ्टिंग आदी विविध जलक्रीडा आणि मनोरंजन कार्यक्रमांचा आनंद येथे घेता येतो. बेपोरपासून जवळच कडलुंडी पक्षी अभयारण्य आहे. स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

पठाणमथिट्टा जिल्ह्यातलं गाव्ही (Gavi) हे एक अग्रगण्य इको-टुरिझम केंद्र (Eco-Tourism Center) आहे. तसंच भारतातल्या पाहण्यायोग्य ठिकाणांपैकी एक आहे. येथे पर्यटकांसाठी ट्रेकिंग, वन्यजीव निरीक्षण, खास तयार केलेल्या तंबूंबाहेरचं कॅम्पिंग आणि नाइट सफारी उपलब्ध आहेत. हे ठिकाणी वनस्पती आणि वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांनी समृ्द्ध आहे. टेकड्या, दऱ्या, उष्णकटिबंधीय जंगलं, विस्तीर्ण गवताळ प्रदेश, धबधबे, वेलचीची शेती येथे पाहायला मिळते. गाव्हीच्या परिसरात निलगिरी ताहर आणि लायन टेल्ड मकाकसारखे दुर्मीळ प्राणी पाहायला मिळतात.

पलक्कड जिल्ह्यात ईशान्येला वसलेल्या सायलेंट व्हॅलीला (Salient Valley) 1984 मध्ये राष्ट्रीय उद्यान असं नाव देण्यात आलं. वाघ, हत्ती, साप, बिबट्या, लायन टेल्ड मकाक आणि मलाबार जायंट स्क्विरलपासून ते पतंग, विविध किडे, टोड असे विविध प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय 1000 हून अधिक फुलं, वनस्पतीच्या प्रजाती आणि 110 प्रजातींची ऑर्किड्स येथे पाहायला मिळतात. येथे पर्यटकांना ट्रेकिंग आणि कॅम्पिंगची पॅकेजेसही उपलब्ध आहेत.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स