शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

प्रवासाला जाताय ना, मग हलक्या बॅगा वापरा की!

By admin | Updated: May 5, 2017 16:31 IST

प्रवासात आपल्या सामानाच लोढणं होवू नये म्हणून योग्य आकाराची, सर्व सामान नीट मावणारी, आपल्या प्रवासाला अनुरुप अशी बॅग निवडणं गरजेचं आहे.

-अमृता कदमप्रवासाच्या तयारीमध्ये जितक्या काळजीनं आपण आपल्या छोट्या-मोठ्या वस्तू निवडत असतो, तितक्याच काळजीनं आपण आपली प्रवासी बॅग निवडतोच असं नाही. चालतंय की असं म्हणत घरातल्याच सुटकेस, हँडबॅगमध्ये कपडे भरले जातात...कधीकधी अगदी कोंबलेही जातात! आपल्या जवळचं सामान नीट भरताना बॅगांची संख्याही वाढते. प्रवासात या ओझ्याचं अगदी लोढणं होतं. त्यामुळेच योग्य आकाराची, सर्व सामान नीट मावणारी, आपल्या प्रवासाला अनुरुप अशी बॅग निवडणं गरजेचं आहे. बॅग निवडताय मग याचा विचार केला का? 1.तुमचा प्रवास किती दिवसांचा असणार आहे, याचा विचार करु न बॅगेचा प्रकार निवडणं आवश्यक आहे. जर तुम्ही वीकेंड ट्रीपसाठी जात असाल, तर तुमच्यासाठी वजनानं हलकी अशी कॅरी आॅन किंवा छोटीशी डफेल बॅगही पुरेशी आहे. जर ट्रीप मोठी असेल तर मात्र बॅगेचा वेगळा पर्यायही ट्राय करु शकता. 2.तुम्ही कोणत्या वाहनानं प्रवास करणार आहात याचाही विचार बॅग निवडताना करणं गरजेचं आहे. तुम्ही विमानानं प्रवास करणार आहात की ट्रेननं की बसनं यानुसारही बॅगेचा प्रकार बदलू शकतो. तुमचा प्रवास जर ट्रेन आणि बस, विमान आणि बस किंवा ट्रेन असं दोन किंवा अधिक वाहनांचं कॉम्बिनेशन असेल तर मात्र सर्वांत मस्त पर्याय लाइटवेट कॅरी आॅन किंवा चाकं असलेली बॅकपॅक!3.तुम्ही जर ट्रेकिंग, दुर्गम ठिकाणी कँम्पिंगसाठी, अ‍ॅडव्हेंचर ट्रीपसाठी जाणार असाल तर हलक्या वजनाचे बॅगपॅक पुरेसे आहेत. पण छान रमत-गमत फिरण्यासाठी काढलेली ट्रीप असेल, मुक्काम हॉटेलमध्येच करणार असाल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हाताशी वाहन असेल तर मोठी ट्रॅव्हल बॅग घ्यायला काहीच हरकत नाही. आपल्या प्रवासाचं स्वरु प हे काही नेहमीच एकसारखं नसतं. त्यामुळेच वर नमूद केलेल्या गोष्टींचा विचार करून तुम्ही प्रवासी बॅगांचं स्वत:चं असं छान कलेक्शन करु शकता.प्रवासी बॅगेचे पर्याय

* लाइटवेट कॅरी आॅनवीकेंड ट्रीप्स, एखाद्या रात्रीचा मुक्काम किंवा छोटीशा बिझिनेस ट्रीपसाठी अतिशय उपयुक्त. रिट्रॅक्टेबल हँडल, टिकाऊ चाकं, तुमचं सामान नीट ठेवण्यासाठी कप्पे यांमुळे बऱ्याच लोकांची पसंती कॅरी आॅनना असते. शिवाय विमान प्रवासामध्ये एअरलाइन्सनं घालून दिलेली सामानाच्या वजनाची मर्यादा पाळण्यासाठीहा कॅरी आॅन सोयीचे पडते. * डफेल बॅग आणि रोलिंग बॅग्सएक मोठी सुटकेस तिच्या हँडलला धरून वागवत नेण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. तुम्हाला जर तुमचं सामान शिस्तीत, ऐसपैसपणे भरायचं असेल तर डफेल बॅग तुमच्यासाठी उत्तम. रोलिंग बॅगचाही आॅप्शन त्यासाठी चांगला आहे. शिवाय तुम्हाला बॅगेला दोनच चाकं हवी आहेत की चार चाकं हे तुमच्या सोयीनं तुम्ही ठरवू शकता. चार चाकांचा फायदा हा की बॅग कुठेही खेचत नेणं सोपं होतं. फक्त बॅग घेताना ती चांगल्या प्रतीची बघून घ्यावी. नाहीतर त्याची चाकं लवकर झिजतात तरी किंवा तुमचा कंट्रोल न राहता बॅग वेडीवाकडी ओढली जाते.

 

* बॅकपॅकविंचवाचं बिऱ्हाड पाठीवर तसंच प्रवासात आपलं सामान आपल्या पाठीवर लादूनच फिरायचं. फिरताना दोन्ही हातही रिकामे आणि पायी पायी फिरायलाही सोयीच्या अशा बॅकपॅक. शिवाय आधुनिक पद्धतीच्या या बॅगपॅक वजनानं हलक्या असल्यामुळे तुम्हाला बोजा वाहून नेत असल्याचंही फीलिंग येत नाही. त्यामुळेच वीकेंडला भटकायला निघणाऱ्या तरु णाईच्या कलेक्शनमध्ये बॅकपॅक असतेच!

 

* ट्रॅव्हल पॅकजुन्या काळातल्या अवजड सुटकेसना हा आधुनिक पर्याय. वापराच्या आणि उपयोगाच्या दृष्टीनं हा प्रकार खूपच लवचिक आणि अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्सनंयुक्त आहे. लांबच्या आणि खूप दिवसांच्या प्रवासासाठी जाताना इतर कशाहीपेक्षा ट्रॅव्हल पॅकला पसंती देणं केव्हाही सोयीचं. सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. तुम्ही तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स करत असाल, तर तुमच्या बॅगांच्या कलेक्शनचाही मुहूर्त करु न टाका. म्हणजे प्रवासातलं मोठं ‘ओझं’ हलकं होऊन जाईल.