दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:05 IST2025-10-10T06:05:44+5:302025-10-10T06:05:52+5:30

अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या गावी परतत आहेत. तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढताना दिसून येत आहे.

Diwali tourism sees record growth this year; festive holidays and religious travel combined | दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 

दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : या वर्षी दिवाळीच्या काळात देशात उत्सवी पर्यटनात विक्रमी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय लोक आता पारंपरिक सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड घालत आहेत. त्यामुळे बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या गावी परतत आहेत. तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे लोक कुटुंबीयांसोबत एकत्र येण्यासोबत अध्यात्मालाही सुट्ट्यांशी जोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्षातून एकदा कुठेतरी बाहेर जाण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय समाजात रुजताना दिसत आहे.

युरोप, आशियाला पसंती
मागो यांनी म्हटले की, भारतीयांचा आंतरराष्ट्रीय प्रवासही वाढला असल्याचे दिसून येत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर यूएई, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम ही भारतीय लोकांची प्रमुख पसंतीची ठिकाणे ठरली आहेत. स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटाली आणि मालदीव यांसारख्या परदेशी ठिकाणांनाही मोठी मागणी आहे.

देशांतर्गत प्रवासात या स्थळांना प्राधान्य
देशांतर्गत प्रवासात केरळ, राजस्थान, उत्तराखंड, अंदमान तसेच अयोध्या, वाराणसी, चारधाम आणि कैलास मानसरोवर ही धार्मिक स्थळे विशेष लोकप्रिय ठरत आहेत.

१२ दिवसांपर्यंत दीर्घ सुट्ट्या घेण्याकडे कल
‘थॉमस कुक (इंडिया)’चे अध्यक्ष राजीव काळे म्हणाले की, अनेक पिढ्यांचा समावेश असलेली कुटुंबे एकत्र
प्रवास करून सण साजरा करण्याकडे वळत आहेत. 
तीन दिवसांच्या पारंपरिक सुट्ट्यांऐवजी आता सहा ते बारा दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या घेतल्या जात आहेत.

Web Title : दिवाली पर्यटन में रिकॉर्ड वृद्धि: छुट्टियों का धार्मिक यात्रा से मेल

Web Summary : दिवाली पर उत्सव पर्यटन में वृद्धि देखी गई क्योंकि भारतीय छुट्टियों को धार्मिक यात्रा के साथ जोड़ रहे हैं। केरल जैसे घरेलू गंतव्य और धार्मिक स्थल पसंदीदा हैं। यूएई, सिंगापुर और यूरोप की अंतर्राष्ट्रीय यात्रा भी बढ़ी है, कई लोग लंबी छुट्टियां पसंद कर रहे हैं।

Web Title : Diwali Tourism Sees Record Surge: Holidays Merge with Religious Travel

Web Summary : Diwali witnessed a surge in festive tourism as Indians combine holidays with religious travel. Domestic destinations like Kerala and religious sites are favored. International travel to UAE, Singapore, and Europe is also up, with many opting for longer vacations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.