शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत १२ तारखेपासून बदल; ‘मुंबई-करमाळी’चा मडगावपर्यंत विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:00 IST

 सुधारित वेळापत्रक १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाडी निर्धारीत वेळेत येण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने  दिवा-सावंतवाडी रोड-दिवा (दैनिक) एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ आणि १०१०६ या गाड्यांच्या वेळा ‘प्रीपोन’ म्हणजेच अधिक लवकर करण्यात आल्या आहेत.  सुधारित वेळापत्रक १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.

दिवा ते सावंतवाडी रोड धावणारी ट्रेन क्रमांक १०१०५ ही सध्या रोहा स्थानकावर सकाळी ९:००  ते ९:०५  या वेळेत थांबत होती. सुधारित वेळापत्रकानुसार हीच गाडी आता रोहा स्थानकावर सकाळी ८:५०  ते ८:५५ या वेळेत थांबणार आहे. त्यामुळे सकाळच्या प्रवासात वेळेची बचत होऊन प्रवाशांना पुढील प्रवास अधिक सुकर होणार आहे.

नव्या वेळापत्रकानुसार...

सावंतवाडी रोड ते दिवा मार्गावरील ट्रेन क्रमांक १०१०६ ही सध्या सायंकाळी ५:२०  ते ५:२५ या वेळेत धावत होती. नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी आता १७:०५  ते ५:१०  या वेळेत धावणार आहे. 

संध्याकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकर गंतव्यस्थानी पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान,  या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

‘मुंबई-करमाळी’चा मडगावपर्यंत विस्तार 

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई)–करमाळी–लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२११५/२२११६) मडगाव जंक्शनपर्यंत चालविण्याचा कालावधी रेल्वे प्रशासनाने पुढे वाढवला आहे. ही गाडी करमाळीऐवजी मडगाव जंक्शनपर्यंत धावण्याचा निर्णय आता १२ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. कोकण व गोवा परिसरात पर्यटन, नोकरी, व्यवसाय तसेच वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विस्तार केल्याने दक्षिण गोव्याच्या प्रवाशांना थेट फायदा होत आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Diwa-Sawantwadi Express Timings Revised; Mumbai-Karmali Extended to Madgaon

Web Summary : Central Railway revises Diwa-Sawantwadi Express timings from January 12, 2026, to improve punctuality. The Mumbai-Karmali weekly express, serving Konkan and Goa, is extended to Madgaon until February 12, benefiting South Goa travelers.
टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सcentral railwayमध्य रेल्वे