भारत आणि श्रीलंका सीमेवरील 'या' ठिकाणी रात्री जाण्यास घाबरतात लोक, इथेच आहे रामसेतु!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 02:55 PM2019-09-11T14:55:06+5:302019-09-11T15:02:08+5:30

तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो.

Dhanushkodi the closest point to srilanka | भारत आणि श्रीलंका सीमेवरील 'या' ठिकाणी रात्री जाण्यास घाबरतात लोक, इथेच आहे रामसेतु!

भारत आणि श्रीलंका सीमेवरील 'या' ठिकाणी रात्री जाण्यास घाबरतात लोक, इथेच आहे रामसेतु!

Next

तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो. एकेकाळी इथे लोकांची मोठी वस्ती होती. पण आता हे ठिकाण पूर्णपणे रिकामं झालं आहे.

धनुषकोडी येथे दिवसा खूप लोक भेट देतात. पण रात्र होताच लोक येथून निघून जातात. कारण इथे अंधारात फिरण्यावर बंदी आहे. लोक सांयकाळ होताच रामेश्वरमला परत जातात. कारण धनुषकोडीपासून रामेश्वरमचं अंतर १५ किलोमीटरचं आहे. आणि हा रस्ता फारच शांत आणि भीतीदायक आहे. अनेक लोक या ठिकाणाला भूताचं ठिकाण असंही म्हणतात.

(Image Credit : Social Media)

१९६४ मध्ये आलेल्या भयावह चक्रीवादळाआधी धनुषकोडी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि तीर्थ स्थळ होतं. त्यावेळी इथे रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, चर्च, हॉटेल आणि पोस्ट ऑफिस अशा सगळ्याच सुविधा होत्या. मात्र, चक्रीवादळात सगळंच नष्ट झालं. असे म्हणतात की, त्यावेळी १०० पेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणारी रेल्वे समुद्रात बुडाली होती. त्यानंतर या ठिकाणी कुणी आलंच नाही.

(Image Credit : Social Media)

पौराणिक मान्यतांनुसार, धुनषकोडी हे तेच ठिकाण आहे, जिथे समुद्रावर रामसेतुचं निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हणतात की, या ठिकाणी भगवान रामाने हनुमानाला एका पुलाचं निर्माण करण्याचा आदेश दिला होता. ज्यावरून वानर सेना लंकेत गेली होती. या ठिकाणी भगवान रामाचं एक मंदिरही आहे.

(Image Credit : Social Media)

असे म्हणतात की, रावणाचा भाऊ विभीषण याच्या विनंतीवरून भगवान रामाने धनुष्याच्या एका टोकाने सेतु तोडला होता. त्यामुळेच या ठिकाणाचं नाव धनुषकोडी पडलं आहे. 

Web Title: Dhanushkodi the closest point to srilanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.