धैर्या ज्योती विनोेद कुलकर्णी एव्हरेस्टवीर, सातारा
लहानपणी कळायला लागले, तेव्हापासून माझी दिदी शौर्याला मॅरेथॉन, बाॅक्सिंग व ट्रेकिंग खेळताना पाहिले. मी आई-बाबांकडे तिच्याबरोबर ट्रेकिंगला जाण्याचा हट्ट करायचे. पाच वर्षांची असताना मला दिदीसोबत कोयना जंगल ट्रेकला आईने पाठविले. त्यावेळी एवढा अद्भूत निसर्ग मी पहिल्यांदा पाहत होते. जंगलातील पक्ष्यांचा आवाज, धबधबे पाहून खूप हरखून गेले. पुढे कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील आणखी एक चकदेव पर्वत, महिमानगर व कांदाटी खोरे असा तीन दिवसांचा ट्रेक केला.२०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. मी व दिदी घरात बसून कंटाळलो होतो म्हणून माझ्या बाबांनी मला खूप पुस्तके वाचायला आणून दिली. ‘जेवढी पुस्तके वाचणार, तेवढे खाऊसाठी पैसे देणार,’ असे सांगितले. अन् मी वाचायला सुरुवात केली. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पुस्तकही वाचले. एक भारतीय वंशाची व्यक्ती ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले, त्या इंग्लंडचा पंतप्रधान होते, मग आपणही बाहेरच्या देशात जाऊन काहीतरी करू, असे वाटू लागले. मी आई-बाबांना ही गोष्ट सांगितली. तर ते म्हणाले, त्यासाठी तुलाही सुनकप्रमाणे खूप कष्ट करावे लागतील. मी हो म्हटले; पण पुढे काय करायचे, हे ठरले नव्हते.
अजिंक्यतारा ते एलब्रुस
माझी आई शिक्षिका असल्याने तिच्या शिस्तीने मला सकाळी लवकर उठण्याची सवय लागली. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, सांबरवाडी सुळका व जरंडेश्वरचा डोंगर ही माझी ट्रेकिंगसाठीची ठिकाणे. आईसोबत पहाटे ४ वाजता उठायचं. मग मी, दिदी आणि कैलास सर जवळचा एखादा ट्रेक करून सकाळी ७:३० वाजता घरी यायचो. आवरून शाळेत जायचं.एप्रिल २०२४ मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट (नेपाळ) सर करण्याची संधी आली. बंगळुरू येथील एव्हरेस्टवीर प्रियंका मोहिते यांच्या मार्गदर्शनात १७,५०० फुटांचे एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये आफ्रिका खंडातील सर्वात उंच किलीमंजारो शिखर सर केले. जेव्हा मी १८,५१० फूट उंचीचे माउंट एलब्रुस शिखर सर केले अन् हाती भारताचा झेंडा आला. तेव्हा मला जग जिंकल्याचा आनंद झाला.१४ ऑगस्ट २०२५ रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुस धैर्याने सर केले. ज्यावेळी तिच्या कोचचा ‘डन, काँग्रॅच्युलेशन्स...’ असा मोबाईलवर मेसेज आला, तसे माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू सुरू झाले, अशी आठवण धैर्याची आई ज्योती यांनी सांगितली.(शब्दांकन : हणमंत पाटील, वृत्तसंपादक)
Web Summary : Inspired by her sister and fueled by books during lockdown, 13-year-old Dhairya conquered Mount Elbrus. Early morning treks with her mother prepared her for Everest and Kilimanjaro, showcasing incredible determination.
Web Summary : अपनी बहन से प्रेरित और लॉकडाउन के दौरान किताबों से उत्साहित होकर, 13 वर्षीय धैर्या ने माउंट एल्ब्रस को जीता। अपनी माँ के साथ सुबह की ट्रेकिंग ने उन्हें एवरेस्ट और किलिमंजारो के लिए तैयार किया, जो अविश्वसनीय दृढ़ संकल्प का प्रदर्शन करती है।