​चला, समुद्र किनारी फिरुया..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 18:41 IST2017-05-23T13:11:36+5:302017-05-23T18:41:36+5:30

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समुद्र किनारी फिरणे एक आल्हाददायक अनुभव असतो. उसळणाऱ्या लाटा, समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य, शिवाय अफाट समुद्रात होणारा सुर्यास्त हे नैसर्गिक सौंदर्य पाहून मनाला एक वेगळास आभास होतो. चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक सुंदर समुद्र किनाऱ्याविषयी...

Come on, beach bay ..! | ​चला, समुद्र किनारी फिरुया..!

​चला, समुद्र किनारी फिरुया..!

ong>-Ravindra More
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समुद्र किनारी फिरणे एक आल्हाददायक अनुभव असतो. उसळणाऱ्या लाटा,  समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य, शिवाय अफाट समुद्रात होणारा सुर्यास्त  हे नैसर्गिक सौंदर्य पाहून मनाला एक वेगळास आभास होतो. हा आनंद घेण्यासाठी समुद्र किनारी फिरणे, वेळ घालविणे कोणाला आवडणार नाही. चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक सुंदर समुद्र किनाऱ्याविषयी...



* राधानगर समुद्र किनारा, अंदमान  
 शुभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी हे खरोखरच वेड लावणाऱ्या या समुद्र किनाऱ्याचा टाईम मॅगॅझीनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून गौरव केला आहे. आहे. निसगार्चं सौंदर्य अनुभवायला येथे जावे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी इत्यादीचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल.      



* कोवालम समुद्र किनार, केरळ 
बहुतेक पर्यटक आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण घालविण्यासाठी या समुद्र किनारी भेट देतात. त्रिवेंद्रमपासून १६ किलोमीटरवर मलिबार किनारपट्टीला लागून कोवालम बीच आहे. विशेष म्हणजे लाइट हाऊस हे या बीचचं खास आकर्षण आहे. शिवाय किनाऱ्यावरील नैसर्गिक दगडी सजावट आणि शांत लाटा हे या किनाऱ्याचे खास वैशिष्ट्ये आहे.  



* बंगाराम बीच, लक्षद्वीप  
चंदेरी वाळू, उबदार पाणी आणि नारळाची झाडे हे या किनाऱ्याचं वैशिट्ये. पावसाळ्यात हेलिकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेले हे बेट जणू एक स्वर्गच. जगातील टॉप टेन किनाऱ्याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी मासे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातो. 



* तारकर्ली समुद्र किनारा, महाराष्ट्र 
कारली नदीचा किनारा हा अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील हा एक निर्मळ आणि सुरक्षित किनारा आहे. सूर्यप्रकाशात अगदी २० फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो. शांत वेळ घालवण्यासाठी येथे निश्चित भेट द्या.

Image result for marari beach, kerala

* मेरारी बीच, केरळ 
केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक सुंदर किनारा. छोटे छोटे रिसॉर्ट्स, लुसलुशीत वाळू, लाटा ही या किनाऱ्याची वैशिट्ये आहेत.       
                                         

Web Title: Come on, beach bay ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.