शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पार्टनरसोबत बीचवर एन्जॉय करायला गोवा नाही तर जवळचं असलेल्या 'या' ठिकाणाला द्या भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 17:00 IST

फिरायला जाण्यासाठी जवळच्या जवळ असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल.

फिरायला जाण्यासाठी जवळच्या जवळ असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही निसर्गसौदर्याचा आनंद घेऊ शकता. गोव्याच्या बीचवर तुम्ही जसं इन्जॉय करता. त्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही महाराष्ट्रातील या ठिकाणी घेऊ शकता. 

वेळणेश्वर या समुद्रकाठच्या पर्यटनस्थळात सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळांमध्ये  वेळणेश्वर गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळणावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.  वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण २२ कि.मी. अंतरावर गाव आहे. सुमारे १२०० वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे. वेळणेश्वर  मंदिराचा इतिहास  म्हणजेच या गावाचा इतिहास आहे.  

वेळनेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरीहून सुमारे १७० किमी दूर स्थित एक पर्यटनस्थळ आहे. येथील समुद्र तटामुळे या जागेचे नाव वेळनेश्वर पडले. मंदिर आणि समुद्र तट असलेले हे गाव स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे. येथील तट नारळाच्या झाडांनी भरलेले आहे. या ठिकणी जाऊन  तुम्हाला खूप आनंद होईल कारण जवळच्याजवळ तुम्हाला या ठिकाणी बीजवर एन्जॉय करता येईल. 

हा बीच बराच मोठा असून कमी गर्दी असल्यामुळे येथे अगदी शांत आणि आनंददायी वातावरण असतं. तटाजवळ महादेवाचे जुने मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १७०० वर्षांपूर्वीचे आहे. स्विमिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही बोटींगचाही आनंद घेऊ शकता.

( हे पण वाचा-भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांना सुद्धा भुरळ घालेलं औरंगाबादची 'ही' नवीन गोष्ट)

या ठिकाणी कसं पोहोचाल

पुण्याहून ३०६ किमी अंतरावर आहे. मुंबईव्यतिरिक्त सर्व मोठ्या शहरांपासून बस व टॅक्सी घेऊन येथे पोहचू शकता.  या पर्यटनस्थळापासून जवळचे  रेल्वे स्थानक चिपळूण  आहे. जे वेळनेश्वरहून ६० किमी अंतरावर आहे. वेळणेश्वर येथील निसर्ग अगदी मनाला प्रसन्न करणारा आहे. इथे येणार्‍या पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे आहेत. तसेच वेळणेश्वर भक्त निवसाताही उत्तम सोय होऊ शकते. ( हे पण वाचा-व्हॅलेनटाईन डे ला पार्टनरला बाहेर घेऊन जायचंय? वन डे रिटर्न ट्रिपसाठी 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट!)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स