महाराष्ट्रातील मुंबईपासून काही अंतरावर पालघर हा जिल्हा आहे.  विकेन्डला इन्जॉय करण्यासाठी  तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.  अगदी कमीतकमी खर्चात या ठिकाणी तुम्ही पर्यटनाचा आंनद घेण्यासाठी जाऊ शकता.  पालघरच्या चौपाटीवर तुम्ही आपल्या पार्टनर सोबत किंवा  कु़टूंबासोबत इन्जॉय करता येईल.

शिरगांव किला

पालघरला शिरगाव किल्ला आहे. इतर किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्यावर सुद्धा रक्षक आहेत. या किल्ल्याचा इतिहास फार जूना आहे. याशिवाय पालघरमध्ये राम मंदिर सुद्धा आहे. या मंदिराविषयी राम लक्षण यांच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. 

केळवा बीच

Image result for kelva beach

पालघरमध्ये प्रसिद्ध केळवा बीच आहे. केळवा बीच हा लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.  रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढून जर तुम्हाला कुठे शांत ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जाऊ शकता. संध्याकाळच्या वेळी या बीचचा सनसेट पाहण्यासारखा असतो. जर  तुम्हाला फोटोग्राफिची आवड असेल तर या ठिकाणी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात अनेक फोटो काढू शकता.  या ठिकाणचे वातावरण खूप शांत आहे. स्ट्रिट फूड खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 

केळवा किल्ला 

Image result for kelva beach

बीचला लागून असल्यामुळे या किल्ल्याचं नाव केळवा किल्ला असं ठेवण्यात आलं. पुरातन काळात पोर्तुगिजांनी हा किल्ला तयार केला होता. या ठिकाणची वास्तूकला त्या काळातील प्रतिभावंत शिल्पकारांच्या कलेचे उदाहरण आहे. 

कसं जालं

ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत तुम्ही पालघरला फिरायला जाऊ शकता. मुंबईपासून तुम्ही ट्रेनने किंवा खाजगी वाहनाने काही तासात पालघरला पोहोचू शकता. रेल्वेने पालघर स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानिक रिक्षा असतात. या रिक्षाने प्रवास करून तुम्ही केळवा बीचला पोहोचू शकता. पालघर रेल्वे स्थानकापासून अगदी २० मिनिटांच्या अंतरावर केळवा बीच आहे. पालघरमध्ये  राहण्यासाठी अनेक रूम्स उपलब्ध आहेत. अत्यंत कमीतकमी दरात तुम्ही या ठिकाणच्या हॉटेल्समध्ये राहू शकता. ( हे पण वाचा-तितली पार्कचे मनमोहक सौंदर्य बघाल तर प्रेमात पडाल, नक्की द्या भेट!)

Web Title: Best trip plan for palghar in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.