(Image credit- neha chaudhary.com)

या हिवाळ्यात थंडीच्या वातावरणात  जर तुम्हाला हा थंडीचा आनंद घ्यायचा असेल, तर मित्र, जोडीदार अथवा फॅमिलीसोबत कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा प्लान करा. यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जेथे तुम्ही थंडीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.


१) महाबळेश्वर


  (Image credit- Traveltringle)

महाबळेश्वर हे सुंदर निर्सगसौदर्य  आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. तसेच महाबळेश्वर येथील काही पॉईंट्स पाहण्यासारखे आहेत. महाबळेश्वर येथील सर्वात उंच पॉईंटसपैकी एक एलफिस्टन पॉईंट आणि विल्सनस पॉईटस हे आहेत. ह्या पॉईंटवरून सुद्धा नयनरम्य निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येतो. तसेच ह्या ठिकाणी जुने महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर अशी पुरातन मंदिरे आहेत जी बघण्यासारखी आहेत. ह्या ठिकाणहून कृष्णा नदीचा उगम होतो. योग्य सिझन मध्ये गेलात तर खास इथल्या ताज्या भाज्या व फळेही मिळतात.

२) लोणावळा व खंडाळा -

(Image credit-kesrinandan travels)

महाराष्ट्रात थंड हवेची जी काही  ठिकाणे आहेत. त्यात  लोणावळा आणि खंडाळ्याचा समावेश होतो. पुणे-मुंबई महामार्गावर समुद्र सपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर असलेले लोणावळा, गेल्या अनेक दशकांपासून पर्यटकांना भुरळ घालत आहे. लोहगड-विसापूर यांच्या वेढ्याने लोणावळ्याचे महत्त्व वाढले आहे. याशिवाय राजमाची किल्ला खंडाळ्यापासून २० मिनिटांच्या अंतरावर आहे. खूप खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर आणि वाऱ्याचा मंद प्रवाह यामुळे लोणावळ्यातून निसर्गप्रेमींचा पायच निघत नाही. लोणावळा आणि खंडाळा यांच्यात अंतर अगदीच पाच-सहा किलोमीटरचे आहे.

३) गगनबावडा 

(Image credit- flickar)

कोल्हापूर पासून ५५ किमी लांब असलेले गगनबावडा हे अतिशय प्रेक्षणीय  ठिकाण आहे. या गावाजवळ गगनगड किल्ला आहे. याठिकाणचे हिरवे डोंगर आणि धुक्यात हरवलेल्या दऱ्या हे या ठिकाणचे आकर्षण आहे.

४) माथेरान-

(image credit- rediff.com)

मुंबई पासून काही किमी अंतरावर असलेल्या हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. माथेरानचे जंगल जैव विविधतेने संपन्न आहे. माथेरानच्या डोंगर द-यातून ट्रेक करताना याचा अनुभव येईल. डोंगर द-यांमधून कोसळणारे धबधबे, झ-याचे मंजूळ संगीत, हे सारे माथेरानचे निसर्ग वैभव आहे. माथेरानच्या वाहतुक व्यवस्थेचे आकर्षण असलेली घोड्यांची वाहतुक लक्ष वेधून घेते. नेरळ हे येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहे.

५) पाचगणी-

(image credit-Goibibo)

पुण्याहून १०० किलोमीटर असणारे पाचगणी महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे. येथील प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशियातील दुसरे मोठे ज्वालामुखीद्वारे तयार झालेले पठार आहे. हे पठार म्हणजे दक्खनच्या पठाराचाच एक विस्तारित भाग आहे. पाचगणीत बघण्यासारखे पॉईंट्स म्हणजे सिडनी पॉईंट,पारसी पॉईंट हे होत. सिडनी पॉईंटवरून धोम धरण व तलाव दिसतो तर पारसी पॉईंटवरून कृष्ण नदीचे मोठे पात्र बघता येते.
 

 

 

Web Title: Best places to visit in this winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.