फोटोग्राफी आणि फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन, बजेटही कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 12:47 PM2019-02-20T12:47:53+5:302019-02-20T12:49:16+5:30

जर तुम्हाला फिरण्यासोबत फोटोग्राफीचीही आवड असेल तर अर्थातच तुम्ही फोटोग्राफीसाठी परफेक्ट असलेल्या ठिकाणांच्या शोधात असालच.

Best places for photography lovers in India | फोटोग्राफी आणि फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन, बजेटही कमी!

फोटोग्राफी आणि फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन, बजेटही कमी!

Next

जर तुम्हाला फिरण्यासोबत फोटोग्राफीचीही आवड असेल तर अर्थातच तुम्ही फोटोग्राफीसाठी परफेक्ट असलेल्या ठिकाणांच्या शोधात असालच. भारतातही फोटोग्राफीसाठी अनेक सुंदर अशी ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर फिरण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासोबतच तुम्ही एकापेक्षा एक सुंदर फोटो क्लिक करू शकता. तुम्हाला जर कमी बजेटमध्ये एक सुंदर फोटो गॅलरी तयार करायची असेल तर तुम्ही भारतातील या ठिकाणांवर भेट देऊ शकता. 

मणिपूरचा लोकटक लेक

मणिपूरच्या सुंदरतेची लोकप्रियता देशभरात आहे. येथील लोकटक लेक म्हणजेच तलावाची चांगलीच चर्चा होत असते. निश्चित रूपाने या तलावाला ताज्या पाण्याचा तलावा मानलं जातं. त्यासोबतच येथील सुंदर नजारे फोटोग्राफीसाठी चांगले पर्याय ठरू शकतात. हे ठिकाण सुंदर निसर्गासाठी चांगलंच लोकप्रिय आहे. पावसाळ्यात इथे फोटोग्राफीसाठी फोटोग्राफर्सची आणि पर्यटकांनी मोठी गर्दी बघायला मिळते. 

हेमिसमधील बिबट्या

जर तुम्हाला एखाद्या शानदार किंवा रूबाबदार प्राण्याला कॅमेरात कैद करायचं असेल तर तुम्ही हेमिस नॅशनल पार्कमध्ये येऊ शकता. येथील बिबट्याला तुम्ही कॅमेरात कैद करू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे फार सहनशक्ती आणि ध्येर्याची गरज असेल. लडाखमधील हेमिस नॅशनल पार्क हे फोटोग्राफीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन म्हणता येईल. कारण वेगवेगळ्या प्राण्यांसोबतच तुम्ही येथील निसर्गालाही कॅमेरात कैद करू शकता. 

उत्तराखंडमधील फुलांचा घाट

फोटोग्राफर म्हणून एक चांगला पोर्टफोलियो तयार करायचा असेल तर तुम्ही उत्तराखंडमधील या ठिकाणी येऊ शकता. कारण उत्तराखंडसारखी सुंदरता तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स भेट देऊन तुम्ही जबरदस्त क्लिक करू शकता. तसेच तुम्ही इथे ट्रेकिंगचा न विसरता येणारा अनुभवही घेऊ शकता. 

अरूणाचलची अपातानी जमात 

ज्या लोकांना ट्रॅव्हल फोटोग्राफी पोर्टफोलियो लोकांसाठी फार गरजेचं आहे की, त्यांनी मानव तत्व असलेली गॅलरी सुद्धा करेल. विशेष रूपाने व्यक्तींच्या काही खास क्लिकसाठी तुम्ही अरूणाचल प्रदेशला भेट देऊ शकता. इथे तुम्ही अपातानी जमातीच्या लोकांचे सुंदर फोटो क्लिक करू शकता. हे लोक फोटो काढण्यासाठी तुम्हाला नकारही देत नाहीत. इथे तुम्ही तुमच्या कल्पनेपलिकडची सुंदरता बघू शकता. 

लडाखमधील पॅंगॉंग त्सो (Pangong Tso)

देशातील वेगवेगळ्या आश्चर्यजनक स्थळांबाबत तुम्ही ऐकलं असेल त्यात लडाखमधील पॅंगॉंग त्सो या ठिकाणाचाही समावेश आहे. हिमालयाची उंची आणि तलावाची भव्यता एकत्र होताना दिसते. हे एक असं ठिकाण आहे जिथे फोटो क्लिक केल्यावर तुम्हाला वेगळे इफेक्ट टाकण्याची गरज पडणार नाही. येथील निळं पाणी तितकच निळं आहे जितकं फोटोंमध्ये दिसतं. या ठिकाणी तुम्ही स्वत: वेगळ्या प्रकारच्या फोटोग्राफीचे प्रयोग करू शकता. 

Web Title: Best places for photography lovers in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.