तुम्हाला रोज ऑफिस आणि  घरातील कामं  कंटाळा आला असेल. तसंच  कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर  आज आम्ही तुम्हाला भारतातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत  गेल्यानंतर मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटू शकता. आपल्या शहराच्या जवळपास असणारी अशी अनेक ठिकाणं असतात पण आपल्याला त्या ठिकाणांबद्दल माहित  नसतं.

Image result for tourist POEPOLE(Image credit- NPR)

अनेकांना  सिनेमा पाहण्याची आवड असते. सिनेमात दाखवले जाणारे लोकेशन्स कुठे असतील असा प्रश्न पडत असतात. कारण सिनेमात दाखवल्या जात असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची उत्सूकता अनेकांना असते. तुम्ही सुध्दा असा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्ल सांगणार आहोत ज्या  ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल ज्या ठिकाणी  गेल्यानंतर तुम्ही आपल्या कुंटूंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.  

Image result for tourist POEPOLE
तेनाली

तेनाली हे पर्यटन स्थळ आंध्रप्रदेशात आहे. या ठिकाणी  लांबचलांब हिरवळ पसरलेली आहे.  या ठिकाणी अनेक चित्रपटाचे शुटिंग सु्द्धा केलं जातं. या ठिकाणी  सेंचुरी और कोरिंगा वाइल्डलाइफ सेंचुरी यांसारखी  फिरण्याची ठिकाणं आहेत.  तुम्हाला  या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही रेल्वेने सुद्दा जाऊ शकता.

माळशेज घाट

मुंबईपासून १४० किलोमीटर अंतरावर माळशेज घाट हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला रंगेबीरंगी पक्षी  पहाण्याचा आनंद घेता  येईल. जर तुम्हाला बाईकरीईडींग आवडत असेल तर तुम्ही बाईकने  या ठिकाणी आपल्या पार्टनरसोबत जाऊ शकता. 'रब ने बना दी जोड़ी', 'रावण'  या चित्रपटांचे शुटिंग या ठिकाणी झाले होते. 

हर्षिल

'राम तेरी गंगा मैली' या चित्रटपटाचे शुटींग या ठिकाणी झाले होते.  या चित्रपटात जे सुंदर झरे दाखवण्यात आले होते.  हा नजारा उत्तराखंडच्या  हर्षिल या गावाचा होता.  हिवाळ्यात जर तुम्हाला पार्टनर सोबत मजा करण्यासाठी जाण्याचा विचार असेल तर तुम्ही  हर्षिल या ठिकाणी जाऊ शकता. यासोबतच उत्तराखंडमध्ये असलेल्या अनेक मजेदार गोष्टी पाहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

आभानेरी

Image result for abhaneri

जयपूर पासून ४५ किलोमीटर अंतरावर अभानेरी हे पर्यटन स्थळ आहे. 'भूल भुलैया', 'द डार्क नाइट राइजेस', 'द बेस्ट एक्जॉटिक मैरीगोल्ड होटल'  या चित्रपटांचते शुटिंग या ठिकाणी  झाले होते. पार्टनरसोबत जाण्यासाठी तुम्ही  जर खास ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी  हे उत्तम ठिकाणं आहे.  शिवाय राजस्थानमध्ये अनेक फेस्टिवल्स चालू आहेत. त्यांना सु्द्धा तुम्ही भेटी देऊ शकता. हा फेस्टिवल २९  जानेवारीला सुरू होणार आहे.  हा फेस्टिवल २ फेब्रुवारीपर्यंत असेल. या ठिकाणंचे आकर्षण असलेल्या नारायण हवेली आणि नाशना हवेली या ठिकाणी  हा फेस्टिवल असणार आहे.

Web Title: Best places to go for travel with partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.