शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आयफोनच्या किंमतीएवढ्याच खर्चात परदेश दौरा शक्य आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 19:27 IST

खरं तर गॅजेट आणि ट्रीप यांचा एकमेकांशी संबंध नाहीये. बाजारात येणारे फोन किंवा नवीन गॅजेट घेताना आपण खर्चाचा विचार करत नाही. मग आपल्या शरीर-मनाला शांती देणारा अनुभव घेतानाच किंमतीचा विचार का? म्हणूनच आयफोनच्या किमतीशी तुलना करु न वेगवेगळ्या पर्यटनस्थळांची ही माहिती परदेश दौरेही कसे परवडू शकतात हे सांगतात.

ठळक मुद्दे* सेशेल्स बेटं तुम्हाला तुमच्या धकाधकीपासून दूर घेऊन जातात. जगातल्या उत्तम रीसॉर्टसपैकी काही रीसॉर्ट आणि स्कूबा डायव्हिंगसाठीही सेशेल्स प्रसिद्ध आहे.* भारतीय पर्यटकांसाठी श्रीलंका हेसुद्धा उत्तम बजेट डेस्टिनेशन आहे. एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी पर्यटकांना जे काही लागतं, ते सगळं काही या छोट्याशा देशांत पहायला मिळतं.* नेपाळसाठीचे टूर पॅकेजेसचे दर 40.000 रूपयांपासून सुरु होतात. म्हणजे पुन्हा एकदा आयफोनच्या निम्म्या किमतीतच.* तुम्ही जर बजेटमध्ये असलेल्या तरीही हटके ठिकाणाच्या शोधात असाल तर तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुल उत्तम ठिकाण आहे. भारतातून इस्तंबुलच्या प्रवासाचा खर्च अवघा तीस हजार रूपये इतका आहे.

- अमृता कदमअनेकजण बजेटच्या भीतीनं आपल्या फिरण्याचे प्लॅन रद्द करतात किंवा मग जवळच कुठे तरी जाऊ असं म्हणून तडजोड करतात. पण अशी तडजोड करण्यापूर्वी एकदा विचार करा. कारण ज्या किंमतीला आयफोन एक्स येतो त्या किंवा त्याहीपेक्षा कमी किंमतीत फिरता येईल अशीही अनेक ठिकाणं आहेत.टेक्नॉलॉजीच्या मोहातून बाहेर पडून एखादा सुंदर अनुभव आयुष्यात कमवायचा असेल तर या ठिकाणांची माहिती असायलाच हवी.

 

1.

 

सेशेल्स

हा देश म्हणजे हिंदी महासागरातला 115 बेटांचा समूह आहे. या बेटांपैकी काही बेटं ही नितांत सुंदर असून पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहेत. निवांत बीचेस, रंगीेबिरंगी प्रवाळं आणि सर्वत्र हिरवळ हे इथल्या सौंदर्याचं विशेष.सेशेल्स बेटं तुम्हाला तुमच्या धकाधकीपासून दूर घेऊन जातात. जगातल्या उत्तम रीसॉर्टसपैकी काही रीसॉर्ट आणि स्कूबा डायव्हिंगसाठीही सेशेल्स प्रसिद्ध आहे. याच कारणांमुळे सध्या भारतीय पर्यटक हनीमून डेस्टिनेशन म्हणूनही सेशेल्सला पसंती देतात. आता सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च. भारतातून सेशेल्ससाठीची वेगवेगळी पॅकेजेस चाळीस हजार रूपयांपासून सुरु होतात. म्हणजेच आयफोन एक्सच्या अवघ्या निम्म्या किंमतीत सेशेल्सची सैर होऊ शकते. 

 

2. श्रीलंका

भारतीय पर्यटकांसाठी श्रीलंका हेसुद्धा उत्तम बजेट डेस्टिनेशन आहे. एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी पर्यटकांना जे काही लागतं, ते सगळं काही या छोट्याशा देशांत पहायला मिळतं. स्वच्छ आणि सुंदर बीचेस, जंगलं आणि विविध जागतिक वारसास्थळं. श्रीलंकन जेवणाची चवही पर्यटकांना चांगलीच भावते. भारतातून श्रीलंकेला जाण्याचा विमान खर्च कमीत कमी चौदा हजार रूपयांपर्यंत आहे. शिवाय इथे राहण्या-खाण्याचा खर्चही सहा हजार रु पये इतकाच होतो. 

 

 

3. नेपाळ

हिमालयाच्या कुशीतल्या या छोट्याशा देशाला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे. बर्फाच्छादित शिखरं, सुंदर मंदिरं, बौद्ध विहार आणि छोटीछोटी गावं. भारतातून नेपाळला जाण्यासाठी पासपोर्टचीही गरजही नाही. त्यामुळे हे भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. नेपाळसाठीचे टूर पॅकेजेसचे दर 40.000 रूपयांपासून सुरु होतात. म्हणजे पुन्हा एकदा आयफोनच्या निम्म्या किमतीतच. 

 

4. इस्तंबुल

तुम्ही जर बजेटमध्ये असलेल्या तरीही हटके ठिकाणाच्या शोधात असाल तर तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुल उत्तम ठिकाण आहे. भारतातून इस्तंबुलच्या प्रवासाचा खर्च अवघा तीस हजार रूपये इतका आहे. युरोपियन आणि इस्लामिक संस्कृतीचं मिश्रण इस्तंबुलमध्ये पाहायला मिळतं. बीचेस, वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या मशिदी आणि मिनार हे इस्तंबुलचं खास वैशिष्ट्य. 

5. बँकॉक

बँकॉक-पट्टाया हे तसंही भारतीय पर्यटकांचं लाडकं ठिकाण आहे. बँकॉकच्या राऊण्ड ट्रीपचा खर्च तीस हजार रूपये आहे. बँकॉक उत्तम शॉपिंग डेस्टिनेशन तर आहेच, पण त्याचबरोबर निसर्गसौंदर्य, बौद्ध विहारं इथे आहेतच. पण त्याचबरोबर बँकॉक नाइटक्लबसाठीही प्रसिद्ध आहे. 

6. बाली

बाली बेटांवर घालवलेला आठवडा तुमच्या अकाऊण्टवर फक्त साठ हजार रु पयांचाच भार टाकेल. बाली बेटांवर निसर्गानं सौंदर्याची जी उधळण केली आहे, त्यामुळे या बेटाला पाचूचं बेट किंवा देवाचं बेट म्हणूनही ओळखलं जातं. सोनेरी वाळूच्या समुद्रकिना-याना हिरवाईची झालर, लांबवर पसरलेली भातशेतं, ज्वालामुखीय पर्वतरांगा आणि प्राचीन वास्तू. बजेटमध्ये बसणारी ट्रीप तुम्हाला नक्कीच अवर्णनीय आनंद देईल.खरं तर गॅजेट आणि ट्रीप यांचा एकमेकांशी संबंध नाहीये. बाजारात येणारे फोन किंवा नवीन गॅजेट घेताना आपण खर्चाचा विचार करत नाही. मग आपल्या शरीर-मनाला शांती देणारा अनुभव घेतानाच किंमतीचा विचार का? म्हणूनच आयफोनच्या किमतीशी तुलना करु न वेगवेगळ्या पर्यटनस्थळांची माहिती देण्याचा हा प्रयत्न.