शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

साधं, रांगडं पण अस्सल आनंदाचं कृषी पर्यटन

By admin | Updated: April 10, 2017 16:36 IST

शहरात राहताना शेतात भटकणं, शेतातल्या घरात राहणं, चुलीवरचं जेवण जेवणं असा अनुभव घेणं शक्यच नाही.

- अमृता कदमशहरात राहताना शेतात भटकणं, शेतातल्या घरात राहणं, चुलीवरचं जेवण जेवणं असा अनुभव घेणं शक्यच नाही. त्यासाठी पर्यटन’ हा एकमेव पर्याय. अगदी साधेपणानं निवांत दिवस घालवण्याची संधी हे कृषी पर्यटन देतं. शेतात मनसोक्त हुंदडणं, विहिरीमध्ये पोहणं, झाडांवर चढून कैऱ्या-चिंचा शोधणं, दमून झाडाच्या दाट सावलीमध्ये विसावणं...शहरं वाढत गेली तसं गावाकडे घालवलेल्या या धमाल सुट्यांचं चित्र धूसर होत गेलं. पिकनिक, बाहेरगावी काढलेल्या ट्रिपचा पर्याय समोर असला तरी मातीची ओढ मनात कायम असतेच. शहरी वातावरणातच वाढलेल्यांना गावाकडची मजा लुटता यावी यातूनच अ‍ॅग्रो टूरिझमच्या अर्थात कृषी पर्यटनाच्या संकल्पनेचा जन्म झाला. कृषी-पर्यटनामध्ये तुम्ही एखाद्या शेतामध्ये जाता. इथे तुम्ही दिवसभरही राहू शकता किंवा अगदी दोन-तीन दिवसही. शेतात भटकायचं, शेतातल्याच घरात रहायचं, चुलीवरचं जेवण असा सगळा बेत असतो. टूरिस्ट स्पॉट्सना भेटी, शॉपिंग, चमचमीत, वेगवेगळ्या डिशेस असं काहीच या टूरिझममध्ये नसतं. अगदी साधेपणानं, निवांत दिवस घालवायचे असतात या सहलीत जे आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी दुर्मीळ झाले आहेत. मुंबईकरांसाठी कृषी-पर्यटन म्हटल्यावर सगळ्यांत आधी आठवतं ते म्हणजे सगुणा बाग. मालेगाव-नेरळ रोडवर 16 हेक्टरच्या परिसरात सगुणा बाग पसरली आहे. अमेरिकेहून परत आल्यावर शेखर भडसावळेंनी आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी या फार्मची निर्मिती केली. इथे शेतातल्या भटकंतीशिवाय काही युनिक गोष्टीही आपल्याला पहायला आणि हो, करायलाही मिळतात. सगुणा बागेमध्ये सहा तलाव आहेत, जिथे तुम्ही मासेमारीचा आनंद घेऊ शकता. इथला अजून एक विशेष अनुभव म्हणजे पाण्यात डुंबणाऱ्या म्हशींच्या पाठीवर बसण्याचा. हे बफेलो रायिडंग लहानांसोबतच मोठ्यांसाठीही आनंदाची पर्वणी असतं. शेतात-बागेत मेहनत करु न, गोठ्यामध्ये गाईची धार काढून मस्त जेवण केल्यावर सगळा शिणवटा दूर होतो. राहण्यासाठी कॉटेज, मड हाऊस, पाँड हाऊस असे वेगवेगळे आॅप्शन्सही तुम्हाला सगुणा बागेमध्ये मिळतात. पुण्यापासून अवघ्या 10 किलोमीटरवर असलेलं मुळशी अ‍ॅग्रो-टूरिझम फार्म ही नेहमीच्या रूटिनपेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी, विकेन्ड घालवण्यासाठी उत्तम ठिकाण. बैलगाडीतून शेतात फेरफटका मारायचा, पोहायचं, अगदी काही करायचं नसेल तर शांतपणे आपल्या कॉटेजमध्ये पडून पक्षांची किलबिल ऐकत पडायचं. पारंपरिक पद्धतीचं बोटिंग ही इथली खासियत. केवळ पुण्या-मुंबईजवळच नाही तर छोट्या-छोट्या शहरांच्या जवळपासही हे कृषी पर्यटनाचं प्रस्थ वाढत आहे. म्हणजे अगदी निपाणी-आंबोली हायवेवर बेळगावच्या इथेही अलुरकर रिसॉर्ट्स हे ठिकाण आहे. विशेष म्हणजे इथलं सगळं व्यवस्थापन हे स्थानिक लोकांच्या मदतीनेच पाहिलं जातं. त्यामुळे गावामध्येच रोजगाराच्या संधी निर्माण होतात. कृषी-पर्यटनातला एक थोडासा वेगळा प्रकार म्हणजे वाईनयार्ड्सची सफर. अर्थात आपल्याकडे हा प्रकार फारसा रूळलेला नाही. वाईनयार्डस म्हटलं की आपल्याला सगळ्यांत आधी आठवतं ते म्हणजे नाशिक. इथले द्राक्षांचे मळे आणि वायनरीज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण ज्यांनी ही संकल्पना सर्वांत प्रथम रु जवली ते म्हणजे ‘सुला वाइन्स’. 1996 साली राजीव सामंतांनी सुला वाईन्सची सुरूवात केली. आज जवळपास 3000एकरांच्या परिसरात सुलाच्या स्वत:च्या आणि काँट्रॅक्टवर घेतलेल्या वाईनयार्डसचा पसारा पसरलेला आहे. सुला वाईन्सची सफर आणि वाइन टेस्टिंग सकाळी साडे अकरा ते साडे सहा या वेळेत दररोज अगदी दर तासातासाला होतं. वाइनयार्डच्या सफरीनंतर मस्तपैकी जेवणाचा आस्वादही इथे घेता येतो. सुलाच्याच शेतातून येणाऱ्या ताज्या सेंद्रिय भाज्या जेवणात ा चाखायला मिळतात. इथे इतरही वायनरीज आणि वाईनयार्डस आहेत, जिथे तुम्ही तुमची ट्रिप अरेंज करु शकता. शिवाय काही ठिकाणी राहण्याचीही सोय उपलब्ध आहे. कृषी पर्यटनाच्या वाढत्या प्रस्थामुळे पर्यटनाला तर चालना मिळतेच, पण त्यामुळे कृषी क्षेत्रालाही फायदा होऊ शकतो. लोकांना, नवीन पिढीला शेतकऱ्यांचं जीवन, त्यांचे कष्ट जवळून पहायला, अनुभवायला मिळतात. शेतकऱ्यांच्याविषयी त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण व्हायला मदत होते. शेतकऱ्यांनाही आपल्या शेतीला जोडून आर्थिक उत्पन्नाचं एक साधन निर्माण होत आहे. लहान क्षेत्र असलेले शेतकरी एकत्र येऊन सगळ्यांच्या जमिनीचा योग्य तो वापर करून लोकांसाठी पर्यटनाचा पर्याय निर्माण करु शकतात. कृषीपर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारच्या कृषी खात्याकडूनही कृषी पर्यटनाला उत्तेजन मिळत आहे. त्यामुळेच शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या वेगवेगळ्या गरजा भागवणारा हा पर्याय भविष्यातली एक चांगली संधी आहे.