फिरायला जाण्याचा अर्थ केवळ डेस्टिनेशन कव्हर करणे हा होत नाही. तर त्या ठिकाणावरील खाद्य पदार्थ, कल्चर आणि वेगवेगळ्या गोष्टी बघणं, जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं. ग्रुप किंवा सोलो ट्रिपचा आपलाच एक वेगळा आनंद असतो. त्यात हा प्रवास जर सायकलने केला तर आणखी वेगळी मजा.
सायकलिंग करत तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वेगवेगळ्या गोष्टी निवांत बघू शकता. सायकलिंग करत फिरायला जाणं सोपं नक्कीच नाही, पण याची एक वेगळीच मजा आहे. अॅडव्हेंचर म्हणूण अनेकजण हे करतात. तुम्हालाही असंच काही करायचं असेल आम्ही तुमच्यासाठी सायकलिंगसाठी बेस्ट ठिकाणं घेऊन आलो आहोत.
बंगळुरू ते नंदी हिल्स
जर तुम्हाला शहराच्या आजूबाजूला जाऊन वीकेंड एन्जॉय करायचा असेल आणि तुम्ही बंगळुरूला गेलात तर नंदी हिल्सला जाऊ शकता. या ठिकाणी टीपू सुल्तान उन्हाळ्यात वेळ घालवण्यासाठी यायचा. बंगळुरू ते नंदी हिल्स हा रस्ता फारच सुंदर आहे. या रस्त्यात साधारण ४० टर्न आहेत. जे पावसाळ्यात थोडे धोकादायक ठरू शकतात. सायकलिंग करत इथे पोहोचणं टफ आहे, पण वेगळ्या अनुभवासाठी असंच करावं लागतं.
मुंबई ते अलिबाग
मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी वीकेंड डेस्टिनेशन म्हणूण अलिबाग चांगलं ठिकाण आहे. सायकलिंगसाठी हा रस्ताही परफेक्ट आहे. पावसाळ्यानंतर तर इथे कॅम्पिंग करणाऱ्यांची संख्याही अधिक बघायला मिळते. त्यानुसार येथील ट्रिप प्लॅन करा. सायकलिंग करत गेल्यावर अथांग समुद्र तुम्हाला बाहूपाशात घेण्यासाठी सज्ज असेल.
कलिमपोंग ते जुलूक
समुद्र सपाटीपासून ३०७८ मीटर उंचीवर स्थित जुलूक हे छोटं गाव आहे. पण अॅडव्हेचंर एक्सप्लोर करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. सायकल रायडिंगसाठी येथील रस्त थोडे रिस्की आहेत, कारण इथे फारच वळणदार रस्ते आहेत. त्यामुळे इथे सायकलिंग करताना थोडी अधिक काळजी घ्यावी लागते.
बोमडिला ते तवांग
हा प्रवासही थोडा खडतर आहे पण अशक्य नाही. तुम्हाला तुमच्या स्टॅमिनावर फोकस करावा लागेल. हिरवीगार जंगलं, तांदळाची शेतं आणि चढउतार असलेले सुंदर रस्ते एक रोमांचक अनुभव देऊ जातात. तुम्हाला इथे जायचं असेल तर उन्हाळा हा परफेक्ट कालावधी आहे. कारण पावसाळ्यात व हिवाळ्यात इथे प्रवास करणे फार अडचणीचे असेल.
सोमनाथ ते दीव
सोमनाथ ते दीव जाण्याचा रस्ताही फार सुंदर आणि शानदार आहे. नारळाची झाडे आणि समुद्राचा नजारा तुमचा प्रवास अविस्मरणीय करेल. तसेच रस्त्यात अनेक बघण्यासारखी ठिकाणे सुद्धा आहेत. त्यातील एक म्हणजे गिर नॅशनल पार्क एक आहे.