रोजच्या धावपळीतून ब्रेक हवा आहे? या ठिकाणी जा आणि रिचार्ज व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 01:13 PM2018-04-13T13:13:44+5:302018-04-13T13:13:44+5:30

तुम्हाला हवी असलेली शांतता इथे मिळत नाही. त्यामुळेच देशातील काही ठिकाणांवर खास रिट्रीट सेंटर्स तयार करण्यात आली आहेत.

5 Wellness Retreats In India That’ll Give You That Much-Needed Break | रोजच्या धावपळीतून ब्रेक हवा आहे? या ठिकाणी जा आणि रिचार्ज व्हा

रोजच्या धावपळीतून ब्रेक हवा आहे? या ठिकाणी जा आणि रिचार्ज व्हा

Next

मेट्रो शहरात राहणं अनेक दृष्टीने फायद्याचंही असते तर अनेक दृष्टीने अडचणीचं देखील असतं. कामाचं, फास्ट लाईफचं  टेन्शन तुम्हाला स्वत:ला शोधण्यासाठी, स्वत:ला वेळ देण्यासाठी जागाच देत नाही. तुम्हाला हवी असलेली शांतता इथे मिळत नाही. त्यामुळेच देशातील काही ठिकाणांवर खास रिट्रीट सेंटर्स तयार करण्यात आली आहेत. इथे तुम्हाला रिचार्ज झाल्याचा फिल येईल. असेच काही 10 रिट्रीट सेंटर्सची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. 

आनंद इन द हिमालया

हे देशातील एक लक्झरी आयुर्वेदीक रिट्रीट सेंटर आहे. इथे तुम्हाला आयुर्वेद, योगा आणि वेदांताचं कॉम्बिनेशन बघायला मिळेल. इथे आल्यावर तुम्हाला फिटनेस आणि आरोग्याचा एक वेगळाच अनुभव मिळेल. उत्तराखंडातील घरवाल इथे हे ठिकाण असून योग, विपश्यना, स्ट्रेस मॅनेजमेंट या गोष्टी करायला मिळतील. 

अॅरोव्हिले

अॅरोव्हिले हे पॉंडेचरीतील प्रसिद्ध ठिकाण आहे. ज्या लोकांना रोजच्या धावपळीतून काही काळासाठी सुटका हवी आहे, त्यांच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. इथे वेगवेगळ्या देशातील आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक भेटतील. इथे तुम्हाला एकाग्रता मिळवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच योगा, विपश्यनाही करण्याचं ट्रेनिंग दिलं जातं.

अनाहता रिट्रीट

गोव्यातील अनाहता रिट्रीट सेंटरही चांगलीच प्रसिद्ध आहे. येथील छोटे छोटे कॉटेज तुम्हाला वेगळाच फिल देतील. त्यासोबतच योगा, हेल्दी फूड तुमच्यातील स्ट्रेस दूर करतील. हे ठिकाण मॅन्डेम बिचवर आहे. इथे तुम्हाला बिच योगा, विपश्यना करायला मिळेल. इथे भारताबाहेरील योगा टीचर तुम्हाला ट्रेनिंग देतील. 

श्रेयस योगा रिट्रीट

तुम्हाला जर हिगव्यागार झाडांच्या सहवासात रहायचं असेल तर हे ठिकाण तुमच्या परफेक्ट आहे. बंगळुरुमध्ये हे रिट्रीट सेंटर आहे. इथे तुम्हाला चांगला वेळ घालवण्यासाठी बरंच काही आहे. 

व्हना

तुम्हाला जर आत्मशांती हवी असेल, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, मोकळेपणाने जगायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये हे व्हना रिट्रीट सेंटर आहे. इथे तुम्हाला पुस्तकं, म्युझिक, योगा, हेल्दी फूड अशी धमाल करता येईल.
 

Web Title: 5 Wellness Retreats In India That’ll Give You That Much-Needed Break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.