फक्त 5 सोप्या स्टेप्स आणि तुमचा पासपोर्ट तयार; एक्स्ट्रा चार्जशिवाय 15 दिवसांमध्ये होईल काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:27 PM2019-03-26T14:27:42+5:302019-03-26T14:29:19+5:30

सध्याच्या ऑनलाइन युगामध्ये पासपोर्टसाठी अप्लाय करणं फारसं अवघड काम नाही. एका छोट्याशा ऑनलाइन रजिस्ट्रेशननंतर एक इंटरव्यू क्लियर केल्यानंतर पासपोर्ट सहज मिळून जातो.

5 easy and simple ways to register for indian passport online | फक्त 5 सोप्या स्टेप्स आणि तुमचा पासपोर्ट तयार; एक्स्ट्रा चार्जशिवाय 15 दिवसांमध्ये होईल काम!

फक्त 5 सोप्या स्टेप्स आणि तुमचा पासपोर्ट तयार; एक्स्ट्रा चार्जशिवाय 15 दिवसांमध्ये होईल काम!

googlenewsNext

सध्याच्या ऑनलाइन युगामध्ये पासपोर्टसाठी अप्लाय करणं फारसं अवघड काम नाही. एका छोट्याशा ऑनलाइन रजिस्ट्रेशननंतर इंटरव्यू क्लियर केल्यानंतर पासपोर्ट सहज मिळून जातो. पासपोर्ट फक्त ट्रॅव्हल करण्यासाठीच नाही तर एक आयडी प्रूफ म्हणूनही उपयोगी ठरतो. अनेक मल्टी नॅशनल कंपन्या पासपोर्टशिवाय जॉब ऑफर करत नाहीत. अशातच पासपोर्ट तयार करणं अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे तुमच्याकडेही पासपोर्ट नसेल तर तुम्हीही लवकरात लवकर पासपोर्टसाठी अप्लाय करा. पण कसा? हाच प्रश्न पडला आहे ना? आम्ही सांगतो पासपोर्ट अप्लाय करण्यासाठी काही खास स्टेप्स...

1. ऑनलाइन रजिस्टर करा

पासपोर्ट तयार करण्यासाठी सर्वात पहिली स्टेप म्हणजे, स्वतःचं पासपोर्ट वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करा. www.passport.gov.in या वेबसाइटवर जा आणि 'new user' हा पर्याय निवडून आपली अधिकृत माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. 

2. पासपोर्ट फॉर्म 

वेबसाइटवर स्वतःचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड मिळेल. याचाच वापर करून वेबसाइटवर लॉग-इन करा. लॉग-इन केल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला 'Apply for fresh passport' असा ऑप्शन दिसेल. येथे तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता किंवा थेट ऑनलाइनही भरू शकता. 

3. डॉक्यूमेंट जमा करा 

फॉर्म भरून अपलोड केल्यानंतर पुढीची स्टेप म्हणजे, डॉक्यूमेंट जमा करणं. त्यासाठी आधीच तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्सच्यासॉफ्ट कॉपी तुमच्या सिस्टममध्ये सेव्ह करून ठेवा. एक-एक करून सर्व डॉक्यूमेंट्स अपलोड करा. लक्षात ठेवा, तुमच्या सर्व डॉक्यूमेंट्समध्ये तुमचं नाव तेच असणं गरजेचं आहे, जे तुम्ही पासपोर्ट फॉर्म भरताना त्यावर मेन्शन केलेलं असेल. जर नाव किंवा पत्ता वेगवेगळा असेल तर तुमचं पासपोर्ट अॅप्लिकेशन रद्द होऊ शकतं. 

4. इंटरव्यूसाठी अपॉइंटमेंट घ्या

फॉर्म आणि डॉक्यूमेंट सबमिट केल्यानंतर पासपोर्ट फी भरा. नॉर्मल फ 1500 रूपये आहे. तत्काळ स्वरूपात पासपोर्ट मिळवायचा असेल तर त्यासाठी 3500 रूपये भरावे लागतात. पैसे भरल्यानंतर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पर्याय देण्यात येतो. येथे तुम्हाला जागेसोबतच तुमच्या सवडीनुसार वेळ निवडण्याचाही पर्याय देण्यात येतो. ठिकाण, वेळ निवडल्यानंतर तुमच्या फोनवर संबंधित मेसेज येतो. 

5. आवश्यक ते सर्व डॉक्यूमेंट्स घेऊन इंटरव्यूसाठी जा

इंटरव्यूची अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर बुकिंग स्लिप आणि तुम्हाला काय-काय डॉक्यूमेंट घेऊन जायचे आहेत. त्याची एक कॉपी प्रिंट करा. सर्व  इम्पॉर्टेन्ट डॉक्यूमेंट (ओरिजिनल आणि फोटोकॉपी) एका फाइलमध्येच ठेवा. इंटरव्यूला जाण्याआधी ही फाइल 

तत्काळ सेवा पासपोर्ट तयार करण्याची पद्धत :

साधारण पद्धतीव्यतिरिक्त तत्काळ स्वरूपात पासपोर्ट तयार करण्यासाठी तुम्ह अप्लाय करू शकता. या सेवेतंर्गत 10 दिवसांमध्येच पासपोर्ट तुम्हाला मिळणं शक्य होतं. यासाठी पासपोर्ट वेबसाइटवर 'Annexure F' हा फॉर्म डाउनलोड करून भरावा लागतो. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर प्रत्येक डॉक्यूमेंट एखाद्या मोठ्या पोस्टवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याकडून सहि करणं गरजेचं असतं. याशिवाय तत्काळ पासपोर्ट तयार करणं अशक्य असतं. 

 

Web Title: 5 easy and simple ways to register for indian passport online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.