भारतातील 'या' ४ बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये लपला आहे निसर्गाचा खजिना, एकदा नक्की द्या भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 11:59 AM2019-03-18T11:59:09+5:302019-03-18T12:01:33+5:30

भारतात फिरण्यासाठी अशी अनेक ठिकाणे आहेत जी सुंदरतेसोबतच त्यांच्या वेगळेपणामुळे अधिक चर्चेत असतात.

4 best biosphere reserves in India to visit in summer | भारतातील 'या' ४ बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये लपला आहे निसर्गाचा खजिना, एकदा नक्की द्या भेट!

भारतातील 'या' ४ बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये लपला आहे निसर्गाचा खजिना, एकदा नक्की द्या भेट!

Next

भारतात फिरण्यासाठी अशी अनेक ठिकाणे आहेत जी सुंदरतेसोबतच त्यांच्या वेगळेपणामुळे अधिक चर्चेत असतात. डोंगर, नद्या, तलाव आणि बीच यांव्यतिरिक्त येथील जंगलंही रोमांचक अनुभव देणारे आहेत. भारतात एकूण १८ बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत. 

बायोस्पिअर रिझर्व्ह एक खास वनस्पती आणि जीवांचं वातावरण असतं, ज्याला सुरक्षेसोबतच पोषणाची गरज असते. पूर्णपणे व्यवस्थित या रिझर्व्हना खासकरून वेगवेगळ्या जीवांच्या संरक्षणासाठी तयार केलं जातं.  भारतातील बायोस्पिअर रिझर्व्ह केवळ जनावरांना सुरक्षा देतं असं नाही तर आदिवासी लोक आणि त्यांची जीवनशैलीही सुरक्षित ठेवतात. तसेच ती वाढण्यासही मदत करतात. त्यातील चारची खासियत जाणून घेऊ....

नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह

लोकप्रिय बायोस्फिअर रिझर्व्ह असण्यासोबतच दक्षिण भारतातील नीलगिरी, नॅशनल पार्क आणि वाइल्डलाइफ सेंचुरी सुद्धा आहे. सोबतच भारतातील पहिलं बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. पश्चिम आणि पूर्व घाटावर नीलगिरी डोंगरावर हा रिझर्व्ह स्थि आहे. इथे तुम्ही ३५० प्रकारचे पक्षी, ३९ प्रकारचे मासे, ३१६ प्रकारची फुसपाखरे अशी वेगवेगळ्या गोष्टी बघू शकता. अनेक दुर्मिळ झालेले जीवही तुम्हाला इथे बघायला मिळतात. तसं तर नीलगिरीचं वातावरण नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतं. पण अॅडव्हेंचरची आवड असेल तर या बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये फिरणे वेगळा अनुभव नक्की ठरेल. 

नंदा देवी बायोस्फिअर रिझर्व्ह

उत्तराकंडमध्ये नंदा देवी डोंगरावर बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. समुद्र सपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी फिरायला जाणे एक वेगळाच अनुभव असेल. इथे तुम्ही ३०० प्रकारची झाडे बघू शकता. तसेच वेगवेगळे प्राणी, पक्षीही या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. उन्हाळ्यात इथे फिरायला येण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता. 

पछमढी बायोस्फिअर रिझर्व्ह

१९९९ मध्ये वाइल्डलाइफ संरक्षणासाठी इथे बायोस्फिअर रिझर्व्ह तयार केलं गेलं. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि पक्षी बघायला मिळतात. तसेच यात राहणारे लोक या ठिकाणाला खास बनवतात. येथील डोंगर, हिरवीगार झाडे बघण्यात एक वेगळीच मजा आहे. त्यामुळे वेळ काढून इथे तुम्ही एन्जॉय करायला येऊ शकता. 

सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व्ह

वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये नाव असलेल्या सुंदरबनच्या सौंदर्याचा नजारा बघण्यासाठी खास ठिकाण आहे. मॅंगरोव जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी-पक्षी आणि झाडे तुम्ही इथे बघू शकता. इतकेच नाही तर हे ठिकाण एक व्याघ्र प्रकल्पही आहे. इथे तुम्ही बंगाल टायगर्स बघू शकता. दरवर्षी इथे हजारो पर्यटक येत असतात आणि येथील सौंदर्याचा आनंद घेतात. 

Web Title: 4 best biosphere reserves in India to visit in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.