जगभरात लोकप्रिय आहेत हे तीन आयलॅंड, थरार आणि सोबतच शांततेसाठी परफेक्ट डेस्टिनेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 12:55 IST2018-12-28T12:54:23+5:302018-12-28T12:55:58+5:30
आयलॅंड म्हटलं की, चारही बाजूंनी केवळ निळाशार समुद्र, आयलॅंडवर हिरवीगार झाडे, झरे वेगवेगळी सुमद्री जीव असं दृश्य डोळ्यांसमोर येतं.

जगभरात लोकप्रिय आहेत हे तीन आयलॅंड, थरार आणि सोबतच शांततेसाठी परफेक्ट डेस्टिनेशन!
आयलॅंड म्हटलं की, चारही बाजूंनी केवळ निळाशार समुद्र, आयलॅंडवर हिरवीगार झाडे, झरे वेगवेगळी सुमद्री जीव असं दृश्य डोळ्यांसमोर येतं. असा एकाही व्यक्ती नसेल की, त्याला अशा ठिकाणी फिरायला जायला आवडेल. पण अनेकदा आयलॅंड म्हटलं की, परदेशातील आयलॅंडचाच उल्लेख होतो. पण गेल्या काही दिवसांपासून अंदमान आणि निकोबारमधील तीन आयलॅंड चर्चेत आहेत. मोदी सरकार या आयलॅंड्सची नावे बदलणार आहेत.
येथील द रॉस आयलॅंडचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस आयलॅंड, नील आयलॅंडला शहीद द्वीप आणि हॅवलॉकचं नाव बदलून स्वराज द्वीप केलं जाणार आहे. ३० डिसेंबरला याची घोषणा होणार अशी माहिती आहे. हे तिन्ही आयलॅंड अंदमान-निकोबारमधील लोकप्रिय स्पॉट्स आहेत. त्यामुळेच इथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. चला जाणून घेऊ या आयलॅंडबाबत खास गोष्टी...
हॅवलॉक आयलॅंड
हॅवलॉक आयलॅंड स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि स्वीमिंगसाठी ओळखलं जातं. हे आयलॅंड पोर्ट ब्लेअरपासून केवळ ४१ किलो मीटरच्या अंतरावर आहे.
नील आयलॅंड
नील आयलॅंड सुद्धा स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसहीत वेगवेगळ्या अॅडवेंचरस अॅक्टिविटीसाठी लोकप्रिय आहे. येथील ग्लास बॉटम राइडही चांगलीच लोकप्रिय आहे.
रॉस आयलॅंड
जर तुम्हाला निर्सगाच्या सानिध्यात शांततेत काही वेळ घालवायचा असेल तर ही जागा तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. हे आयलॅंड पोर्ट ब्लेअरपासून केवळ २ किमी अंतरावर आहे.