राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे रविवारी १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यामध्ये पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...
रेणुकाई पिंपळगाव येथील बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने २० ते ३० रुपये प्रतिकिलोने मिरची विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ ...