कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील तीनपैकी सांजूळ आणि फुलंब्री हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. मात्र, वाकोद प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ७७.३२ टक्के भरले आहे. पाणीपातळी ६४१.३९ मीटर झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा १८३.९६४ दलघमी झाला आहे. यातील जिवंत पाणीसाठा १३६.८३४ दलघमी आहे. ...
काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...
मराठवाड्याची तहान पैठण भागविणारे जायकवाडी धरण सोमवारी दुपारी ९७ टक्क्यांवर भरले असून धरणाचे १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे ६ हजार ८८८ क्युसेकने हे पाणी गोदापात्रात झेपावले आहे. गोदावरीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना ...
निम्न दुधना प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा करण्याचे अद्याप आदेश नसल्याने धरणाचे पुन्हा दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात ७५.५ टक्के पाणीसाठा आहे. रविवारी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या वर गेल्याने प्रशासनाने दुपारी ३ ...