वर्धा पाटबंधारे विभाग कार्यालयात हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली; पण याच कार्यालयातील हिरकणी कक्षात सध्या कचराच कचरा असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. ...
तिने विरोध केला असता आरोपीने खिशातून ज्वलनशील पदार्थ असलेली काचेची बाटली काढून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आगडब्बीतील काडीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ...
जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले. ...
टायर फुटल्याचा आवाज आल्याने त्यांनी कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल व वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३०-३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. ...
ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स परिसरात अचानक लागलेल्या आगीत आयटीआय टेकडी परिसरातील विविध प्रजातींच्या सुमारे ३ हजार वृक्षांसोबतच ड्रीपला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
कोमल ही २० दिवसांपासून तिच्या बाळाच्या भेटीच्या प्रतीक्षेत होती. पतीने वाद करून तिला घराबाहेर हकलून दिले व बाळाला घेऊन तो दुसरीकडे राहण्यास गेला. तो कुठे गेला याचा तिला थांगपत्ता नव्हता. ती बाळाचा अन् पतीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकली. ...