सुमारे 1945 पर्यंत फ्रेंच या देशात राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील भव्य दिव्य इमारतींवर फ्रेंच वास्तूशास्त्र, कलेच्या खुणा प्रामुख्याने आढळतात. ...
'हान'च्या किनारीच एक लहानसा पादचारी पुलही उभारण्यात आला असून रेड हार्ट लाईट्सने त्यावर सजावट करण्यात आली आहे. या पुलावरच लोकांकडून परस्परांच्या आनंदासाठी कुलुपे बांधली जातात. ...
आपल्याकडे गल्लीत भाजीपाल्याचा ठेला येतो तसे तेथे सकाळी सकाळी हॉटेलच्या बाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी टू व्हीलरवर पर्यटन उपयोगी सामान घेऊन विक्रेते उभे असतात. ...
अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते. व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात. ...