वैशाली माडे ही मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. वैशाली झी टीव्हीवरील सिंगिंग रिएलिटी शो सारेगमपची २००९ ची विजेती आहे. तिने जास्त गाणी मराठीतील गायली आहेत. मात्र हिंदीत बाजीराव मस्तानी सिनेमातील तिचे पिंगा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच तिने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट कलंकमधील घर मोरे परदेसिया या गाण्यालाही स्वरसाज दिला आहे. Read More