कोरोनाच्या वाढत्या फैलावासमोर अमेरिका आणि यूरोपीय देश हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...
कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ...
आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
युरपमधील इटलीला कोरोनाने सर्वाधिक तडाखा दिला आहे. एकाच दिवसात स्पेनपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू इटलीमध्ये झाला आहे. येथे शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 969 जणांचा मृत्यू झाला. ...
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ...