समाजमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना नवनवी पिके घेण्यासाठी सोयीचे झाले आहे. म्हणूनच हुलगा-मटकीच्या जागी डाळिंब, आंबा, स्ट्रॉबेरीसारखी पिके दिसत आहेत. ...
उजनी धरण पाणलोट क्षेत्र व दहिगाव उपसा सिंचन लाभक्षेत्रात शेतकरी ऊसपिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहे. सध्या ३,२८० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे. ...
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या आदेशानुसार उजनी धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा-सिना जोड कालवा, सिना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शनिवारी पाणी सोडण्यात आले. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून वर्षात ३ वेळा पाणी सोडू. पहिले आवर्तन शनिवार, ४ जानेवारी रोजी सुरू होईल. दुसरे आवर्तन १ मार्च तसेच तिसरे आवर्तन १ एप्रिल रोजी नियोजित आहे. ...
जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. आदेशाप्रमाणे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. ...