राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षींच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १२ प्रकल्प सध्या मायनसमध्ये असून, १५ धरणांमध्ये जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास साठा आहे. परिस्थिती मराठवाड्याची चिंताजनक आहे, मराठवाड्य ...
उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. ...
प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयामध्ये आढळणारे फ्लेमिंगो हिंगणी प्रकल्प (ता. बार्शी) च्या पाणथळ भागामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षी अभ्यासकांसह पक्षीप्रेमिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. मात्र, हिंगणी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने ...
अहमदनगर जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यावरच भिस्त आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...
गेल्या दहा वर्षांनंतर उजनी प्रथमच जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे. पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. मृत साठ्यातील ६३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा उजनीची वजा ५५ ते ६० टक्के पा ...
यावर्षी उजनी धरण १२ ऑक्टोबर रोजी ६०.६६ टक्के भरलेले होते. अपुऱ्या पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरू शकले नाही. ६ मे २०२३ रोजी ते मृत साठ्यात गेले होते; तर ९ जुलै रोजी वजा ३६.१४ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. ...
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. ...
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी पुढील चार ते पाच दिवसांत २२ ते २३ जानेवारीदरम्यान मृतसाठ्यात जाणार आहे. गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदर मृतसाठ्यात जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचे सहा महिने अडचणीचे ठरणार आहेत. ...