उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
Udayanraje Bhosale on Vinayak Mete accident: विनायक मेटेंच्या एसयुव्ही कारला अपघात कसा झाला, यावर तर्कवितर्क लढविले जात असताना पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. ...
आज आलेल्या इंडिया टुडेच्या सर्वेवर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजून काम सुरु केलेले नाही. एक वर्ष द्या, जर आमच्याविरोधात आठजरी जागा निवडून आल्या तरी आम्ही म्हणू की आम्ही काम करण्यालायक नाही, असे केसरकर म्हणाले. ...