महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर महापालिकेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या पाच अष्टमांश म्हणजेच ७७ नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ...
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी करीत असून त्यांच्या हुकूमशाही कारभाराने नागरीक वेठीस धरले जात असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिक ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या तयारीला वेग आला असून, स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी तयार केलेले विशेष महासभेची मागणी करणारे पत्र सोमवारी (दि. २७) नगरसचिवांना सादर केले जाणार आहे. त्यानंतर महापौर रंजना भ ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील असंतोषाला अखेर नगरसेवकांनी अविश्वास ठरावाद्वारे वाट फोडल्याचे वृत्त असून, नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही अशाच प्रकारे तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी आयुक्तांच्या विरोधात स्वाक् ...
शहरात आमदारांच्या निधीतील कामांना आता महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसून महापालिकेकडे भविष्यातील उत्तरदायित्वाचा विचार करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तशी सूचनाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे. ...